मुंबई, 1 जुलै, (हिं.स.)। महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या भारतातील अग्रगण्य एसयूव्ही निर्माती कंपनीने स्कॉर्पिओ-एन या गाडीत लेव्हल-टू अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (एडीएएस) ही सुविधा सादर केली आहे. यासोबतच कंपनीने झेड-एट-टी नावाचे एक नवे मॉडेलही सादर केले. यामुळे प्रीमियम झेड-एट मालिकेचा आकर्षकपणा आणि दबदबा अधिकच वाढणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने, महिंद्रा ‘स्कॉर्पिओ-एन’च्या तीन वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा उत्सवही साजरा करीत आहे. या मॉडेलवर अडीच लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांनी आपला विश्वास दाखवला आहे.
सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे मापदंड – लेव्हल-टू एडीएएस
‘स्कॉर्पिओ-एन’च्या प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षा मानकांवर आधारलेल्या कामगिरीला आणखी पुढे नेत महिंद्रा कंपनीने प्रीमियम झेड-एट-एल या व्हेरिएंटमध्ये लेव्हल-टू अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस) सादर केली आहे. यामध्ये खालील महत्त्वाच्या सुविधा समाविष्ट आहेत :
• समोरून धडक होण्याबाबत पूर्वसूचना
• आपोआप लागणारे आपत्कालीन ब्रेक
• स्टॉप अँड गो या सुविधेसह अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल
• स्मार्ट पायलट असिस्ट
• लेन डिपार्चरचा इशारा
• लेन कायम ठेवण्यासाठी सहाय्य
• ट्रॅफिक चिन्ह ओळख प्रणाली
• हाय बीम असिस्ट
याशिवाय, ‘स्कॉर्पिओ-एन एडीएएस’ प्रणालीत स्पीड लिमिट असिस्ट आणि फ्रंट व्हेईकल स्टार्ट अलर्ट अशी खास वैशिष्ट्येही समाविष्ट आहेत. ‘महिंद्रा’च्या ‘आयसीई एसयूव्ही श्रेणी’साठी ही वैशिष्ट्ये पहिल्यांदाच सादर केली जात आहेत. स्पीड लिमिट असिस्ट ही प्रणाली प्रत्येक रस्त्याच्या वेगमर्यादेनुसार चालकाला सतर्क करत राहते. ‘अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल मोड’मध्ये ही सुविधा एका बटणाद्वारे गाडीचा वेग वेगमर्यादेनुसार आपोआप अॅडजस्ट करते. समोर थांबलेली गाडी हलू लागल्यावर फ्रंट व्हेईकल स्टार्ट अलर्ट ही प्रणाली दृश्यमाध्यम, चेतावणीचा आवाज आणि कंपने यांद्वारे चालकाला सूचित करून वाहतुकीविषयी जागृत करते. या सर्व अद्ययावत वैशिष्ट्यांमुळे ‘स्कॉर्पिओ-एन’चा फाइव्ह-स्टार जीएनकॅप सुरक्षा दर्जा आणखी भक्कम झाला आहे.
झेड-एट-टी व्हेरिएंट – एक दमदार आणि आकर्षक मूल्यवर्धक पर्याय
झेड-एट आणि झेड-एट-एल या व्हेरिएंट्सच्या मधोमध नीटपणे स्थान मिळवलेला नवा झेड-एट-टी हा व्हेरिएंट, ‘स्कॉर्पिओ-एनच्या’ प्रीमियम झेड-एट मालिकेला आणखी भक्कम करतो. ‘झेड-एट-टी’मध्ये काही खास वैशिष्ट्यांचा प्रभावी संयोग आहे. आर-१८ डायमंड-कट अलॉय व्हील्स, सोनीची १२ स्पीकरची ऑडिओ सिस्टीम, फ्रंट कॅमेरा, समोरील पार्किंग सेन्सर्स, ६ प्रकारे वळणारे विद्युत-संचालित ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (ईपीबी), व्हेंटिलेटेड सीट्स आणि ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम यांचा यात समावेश आहे.
कामगिरी, आराम वा स्टाइल यापैकी कशाशीही तडजोड न करता, झेड-एट-टी हे व्हेरिएंट ग्राहकांना अधिक मूल्य देते आणि ‘महिंद्रा’च्या गुणवत्तेची जाण असलेल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम मूल्य देण्याच्या बांधिलकीला अधोरेखित करते.