Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

admin
Last updated: 2025/05/08 at 6:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 8 मे (हिं.स.)।मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्ब्ल १७ वर्षांनी आज, गुरुवारी लागण्याची शक्यता होती.१९ एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल के लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज पार पडलेल्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. १ लाख पेक्षा जास्त आरोपपत्र पान असल्याने वेळ लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३१ जुलै रोजी होणार आहे.

एनआयएने दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यानुसार हा वेळ देण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी उपस्थित होते. पुढच्या वेळी निकाल नक्की लागेल. सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो आणि होईल, असा विश्वासही प्रज्ञासिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाबाबत न्यायालयाची सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे केवळ निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र आता हा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.

मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०१ जण जखमी झाले होते. मालेगाव स्फोट खटल्याचा प्राथमिक तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकानं ११ जणांना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं होतं.हे सर्वजण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित असून त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी काही तरुणांना भोसला मिलिट्री स्कूलमध्ये शस्त्र आणि स्फोटकांचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप एटीएसनं केला होता. यात ज्या एलएमएल फ्रिडम मोटरसायकलवर हा बॉम्ब लावला होता, त्याची मालकी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एटीएसने अटक केली.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
Next Article थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?