Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात

admin
Last updated: 2025/05/14 at 5:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मालेगाव, 14 मे (हिं.स.)।

– भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना मालेगावमधून एका तरुणाने संशयास्पद गुगल सर्चिग केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची सहा तास कसून चौकशी करण्यात आली.पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्येतणाव वाढला आणि युद्ध पेटण्याच्या सीमारेषेवर स्थिती पोहोचली. या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसांनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

मात्र, या काळात मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका ४५ वर्षीय यंत्रमाग मालक तरुणाला पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

सकाळपासूनच एटीएस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचारी मालेगाव शहरात गुप्तपणे कार्यरत होते.

सायबर सेलकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुवार वॉर्ड परिसरातील घरावर छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद वेबसाईट सर्च केल्याचे निष्पन्न झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. यामध्ये काही वेबसाईट्स पाकिस्तानमधील असल्याचा संशय असून संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील कोणत्या व्यक्तींसोबत संपर्क आहेत का? याबाबत चौकशी केली जात आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी – महसूलमंत्री
Next Article सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?