Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात झाला अनोखा विवाह; एकाच मंडपात तरुणाने केले जुळ्या बहिणींसोबत लग्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात झाला अनोखा विवाह; एकाच मंडपात तरुणाने केले जुळ्या बहिणींसोबत लग्न

Surajya Digital
Last updated: 2022/12/03 at 9:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)या लग्नासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

अकलूज : जुळ्या बहिणींनी केले एकाच मुलाशी… लग्न मुंबईतल्या कांदिवलीतील दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. या दोघींचे नातेवाईक सोलापुरात अकलूजमधील आहेत. A unique marriage took place in Solapur; Malshiras Akluj married twin sisters in the same mandap

 

या जुळ्या दोघींच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकेच काय तर एकीला त्रास झाल्यास तो दुसरीलासुद्धा जाणवतो. त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

सध्या मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर कमी झाल्यामुळे अनेक मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. एखाद्या मुलाला चांगले घर असेल, जमीन -जुमला असेल, नोकरी असेल तरी सुद्धा लग्न जमविण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागतात. परंतु माळशिरस तालुक्यातील अकलूज वेळापूर रस्त्यावर असलेल्या नामांकित हॉटेल गलांडेमध्ये मात्र 2 डिसेंबर रोजी निसर्गरम्य वातावरणात एकाच मंडपात एका तरुणाने चक्क दोन जुळ्या बहिणीशी विवाह केल्याची ही घटना घडली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

या लग्नासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

 

दरम्यान या अनोख्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एकाच वेळी एकाच मंडपात एका नवरदेवाने दोन वधूशी विवाह केल्याचे आजवर कधी पाहायला किंवा ऐकायला मिळाले नव्हते. विशेष म्हणजे, त्या दोन वधू जुळ्या बहिणी आहेत. या विवाहाची पत्रिका व त्या संदर्भातोल फोटो सध्या सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत.

 

अकलूज – वेळापूर रस्त्यावरील अकलूज आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गलांडे येथे मंगळवारी ( 2 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजता हा अनोखा व अविस्मरणीय विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. वधू पिंकी आणि वर अतुल हे दोन्ही कुटुंब मुंबईतील आहेत. मुलगा अंधेरीचा तर मुलगी कांदिवली येथील आहेत. त्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यातील आहेत.

या अनोख्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आली होती. त्याचे हळदी व विवाह समारंभाचे फोटोही सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत.  एकीकडे अनेक मुलांना विवाहासाठी एक मुलगी मिळत नसताना या पठ्ठ्याने मात्र एकाच वेळी दोन मुलीबरोबर लग्न केल्यामुळे हा लग्न सोहळा माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #unique #marriage #took #place #Solapur #Malshiras #Akluj #married #twinsisters #mandap, #सोलापूर #अनोखा #विवाह #एकाचमंडपात #तरुण #जुळ्या #बहिणी #लग्न #माळशिरस #अकलूज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article औकातित रहा… खासदार निंबाळकर व आमदार पाटलांमध्ये हमरीतुमरी
Next Article राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?