Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळशिरसमध्ये तीन दिवस बिबट्या म्हणून घातला धुमाकूळ, पण निघाला दुसराच प्राणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माळशिरसमध्ये तीन दिवस बिबट्या म्हणून घातला धुमाकूळ, पण निघाला दुसराच प्राणी

Surajya Digital
Last updated: 2022/09/25 at 10:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
● बारामती रेस्क्यू टीमला तरस पकडण्यात आले यशस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● बारामती रेस्क्यू टीमला तरस पकडण्यात आले यश

वेळापूर : धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे गेले तीन दिवसापासून धर्मपुरी गावाच्या मालकी क्षेत्राच्या परिसरातील रानामधून बिबट्यासदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने खळबळ माजली होती. धर्मपुरी परिसरामध्ये ग्रामस्थांमधून बिबट्याचा वावर असल्याचे व बिबट्या आला असल्याचे तीन दिवसापासून कालवा झाला होता. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Dhumakula pretended to be a leopard for three days in Malshiras, but it turned out to be another animal, Dharmapuri.

ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस यांच्याकडे धर्मपुरी परिसरात बिबट्या अथवा सदृश्य प्राणी फिरत असल्याचे कळविले. लागलीच वनपरिक्षेत्र माळशिरस विभागाचे अधिकारी दयानंद कोकरे यांनी सर्व कर्मचाऱ्यासह जाऊन पाहणी केली. सदृश्य प्राण्याचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला व त्याचबरोबर ग्रामस्थांना जनावरांना कोणताही धोका होऊ नये म्हणून पिंजरा लावण्यात आला होता.

बिबट्या सदृश्य प्राणी पकडण्यासाठी या पिंजऱ्यामध्ये तीन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. पण सदर सदृश्य प्राण्याने तीनही कोंबड्यांचा फडशा पाडून पोबारा केला. त्यानंतर व सलग तीन दिवस सदृश्य प्राण्याचा तपास करूनही तो प्राणी सापडत नसल्याने वनपरिक्षेत्र माळशिरस विभागा चे अधिकारी वैतागले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दयानंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील या विभागाची बारामती रेस्क्यू टीम येथे पाचरण केले. ज्या परिसरातील उसामध्ये प्राण्याचा वावर आहे त्या ठिकाणी बारामती रेस्क्यू टीमने जाळे लावले. तिन्ही बाजूने कालवा चालू केल्याने प्राणी तेथून घाबरून पळून जात असताना तो जखमी अवस्थेत जाळ्यात अडकला. तेव्हा तो तरस असल्याचे निष्पन्न झाले.

त्याची वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस आणि बारामती रेस्क्यू टीमने जाळ्याजवळ जाऊन पाणी केले असता तो बिबट्या नसून ते तरस प्राणी असल्याचे निष्पन्न झाले त्या तरसाला त्या ठिकाणी भुलीचे इंजेक्शन देऊन जखमी पायावर औषधोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पिंजऱ्यात बंदिस्त करून बारामती टीमने ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले जाणार आहे.

तीन दिवसापासून धर्मपुरी परिसरात बिबट्या आल्याचा कालवा झाल्याने पूर्ण गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण बिबट्याऐवजी तरस निघाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Dhumakula #pretended #leopard #threedays #Malshiras #turned #anotheranimal #Dharmapuri #longing, #माळशिरस #तीनदिवस #बिबट्या #धुमाकूळ #दुसरा #प्राणी #तरस #धर्मपुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्याचे अर्धशतक
Next Article सोलापूर । गर्दीमधील तरूणांनी पोलीस अधिकाऱ्याच्या गालावर जाळ काढला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?