Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, 23 जानेवारीला देशभर सरकारी सुट्टी घोषित करावी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, 23 जानेवारीला देशभर सरकारी सुट्टी घोषित करावी

Surajya Digital
Last updated: 2020/11/18 at 6:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे मोदींकडे केल्या आहेत. त्यानंतर, पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी मोदींना पत्र लिहिले असून भावनिक मुद्द्यांना हात घातला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीसंदर्भात हे पत्र लिहिले आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहले आहे. त्यामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य सेनानी दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच, सुभाष चंद्र बोस यांच्या निधनाचे गुढ शोधून काढावे, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. टाइम्स नॉऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी मुखर्जी आयोगाच्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अहवालात कुठलेही कारण किंवा माहिती न देताच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मृत घोषित केलं आहे.

* मृत्यूचे गुढ उलगडण्याचीही मागणी

नेताजी यांचे वंशज सूर्य बोस आणि माधुरी बोस यांनी एक खुले पत्र लिहिले आहे. त्यानुसार, 8 नोव्हेंबर 2005 च्या न्यायमूर्ती मनोज कुमार मुखर्जी यांच्या अहवालात असे नमूद केली की, नेताजी यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसून टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजी यांच्या नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, अशी मागणी केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #ममताबॅनर्जींचे #पंतप्रधानमोदींनापत्र #23जानेवारीला #देशभरसरकारी #सुट्टीघोषितकरावी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यूपीएससीची तयारी करणा-या उमेदवारांस मिळणार दरमहा २६ हजार रुपये
Next Article चप्पल घालून मंदिरात गेल्याने हाणामारी, आ. पडळकरांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?