Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मरिआई चौकातील अपार्टमेंटमध्ये बंदुक घेऊन तरुण घुसला, केली पैशांची मागणी, बंदुक निघाली नकली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मरिआई चौकातील अपार्टमेंटमध्ये बंदुक घेऊन तरुण घुसला, केली पैशांची मागणी, बंदुक निघाली नकली

Surajya Digital
Last updated: 2023/04/28 at 4:24 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
○ अक्कलकोट परिसरात दोन कारची समोरासमोर धडकस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ टेंभुर्णी बस स्थानकात चोरीचा प्रयत्न; दोन महिलांना अटक

सोलापूर : भरदिवसा शहरातील उद्योजकाच्या घरात घुसून त्याला रिव्हॉल्वर दाखवल्याची घटना बुधवारी दुपारी इंद्रधनु अपार्टमेंट मध्ये घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधीत तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर ती बंदूक नकली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तरूणावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. A young man entered the apartment in Mariai Chowk with a gun, demanded money, the gun turned out to be fake Solapur

 

इंद्रधनु अपार्टमेंट येथे विक्रम बंडेवार हे उद्योजक राहतात. ते बुधवारी (ता. 26) घरी असताना त्यांच्या घरी एक तरुण आला. त्याने थेट बंदुक काढून विक्रम यांच्याकडे रोखत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळी घालतो अशी धमकी दिली. यावेळी घरातील सदस्यांनी समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

 

त्याच धावपळीत विक्रम यांच्या मुलीने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती कळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वपोनि उदयसिंग पाटील हे आपल्या पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच त्या तरुणाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यास आणले. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाकडून जप्त केलेली बंदूक ही नकली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, याबाबत संबंधित तरूणावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

○ अक्कलकोट परिसरात दोन कारची समोरासमोर धडक

 

सोलापूर : अक्कलकोट ते गाणगापूरकडे कारमधून जात असताना अक्कलकोटच्या सात किलोमीटर परिसरात दुसऱ्या कारची धडक बसल्याने पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (ता.27) दुपारी घडली.

यात माहतंप्पा बसवणप्पा मसूती (वय-५५, रा. अक्कलकोट), लक्ष्मण सुक्रीव शिंदे (वय-१९, रा.परभणी), मिलिंद विठ्ठल बनकर (वय-४३, रा.विक्रोळी मुंबई), रोनक मिलिंद बनकर (वय-११, रा.मुंबई), आदिनाथ जानकीराम लवटे (वय-१८, रा.आनंदवाडी, परभणी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

गुरूवारी दुपारी अक्कलकोट परिसरात दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनातील पाच जण जखमी झाले. अपघातानंतर त्यांना लगेच उपचारासाठी १०८ ॲम्ब्यूलन्सने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

यात मसूती यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे, तर शिंदे याच्या डोळ्याला,मिलिंद यांच्या मानेला व आदिनाथ यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

 

○ टेंभुर्णी बस स्थानकात चोरीचा प्रयत्न; दोन महिलांना अटक

सोलापूर – टेंभुर्णी येथील बस स्थानकात बसमध्ये प्रवेश करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून १३ हजाराची रक्कम चोरताना सोलापुरातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

 

पूजा प्रकाश जोशी (वय ४२) आणि फातिमा सलीम शेख (वय ४४ दोघी रा. होम मैदान सोलापूर) अशी महिला चोरांची नावे आहेत.  दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुवर्णा उमाकांत वाघमारे (रा.बारलोणी ता.माढा) या आपल्या नातेवाईकांसह टेंभुर्णी बस स्थानकात अकलूज येथे जाणाऱ्या बस मध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी जोशी आणि शेख या दोघी महिलां त्यांच्या पर्समधील १३ हजार रुपये रोख असलेली पाकीट पळवली. त्यावेळी नातेवाईकांना संशय आल्याने दोघींनी पैसे असलेले पाकीट खाली टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी त्यांना पकडून टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दोघीवर गुन्हा दाखल केला .हवालदार ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #youngman #entered #apartment #MariaiChowk #gun #demanded #money #gunturned #fake #Solapur, #मरिआई #चौक #अपार्टमेंट #बंदुक #तरुण #घुसला #पैशांची #मागणी #बंदुक #नकली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अनधिकृतच, 45 दिवसात चिमणी काढा
Next Article हाहाकार ! सोलापुरात ढगफुटीसदृश पाऊस, वादळ वा-यासह जोरदार पाऊस, शहरात बत्तीगुल

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?