Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नगरहून कर्नाटकात जाणारे मांस मंद्रुप पोलिसांनी पकडले; दोघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

नगरहून कर्नाटकात जाणारे मांस मंद्रुप पोलिसांनी पकडले; दोघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 9:04 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भंडारकवठे : अहमदनगरहून विजयपूरला (कर्नाटक) दोन टेम्पो भरून चाललेले मांसाचे तुकडे मंद्रूप पोलीसांनी पकडले. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून वाहनासह एकूण आठ लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली.

याबाबत मंद्रुप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री मंद्रुपचे पोलीस कर्मचारी साहेबराव चव्हाण, रोहन पवार, सुनंद स्वामी व  बापूसाहेब गायकवाड हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कामतीहून मंद्रुपच्या दिशेने दोन टेम्पो भरून मांसाचे तुकडे कर्नाटकात जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही दोन्ही वाहने येळेगाव येथे आल्यानंतर थांबवले. तपासणी केली असता त्यात मांसाचे तुकडे असल्याने दुर्गंधी येत होती. त्यानंतर दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली. यातील (एम एच ४२/ए क्यू ३३९२) या टेम्पोमध्ये एक लाख २० हजाराचे मांसाचे तुकडे व वाहन असे चार लाख ७० हजार रुपये मुद्देमाल मिळाला, तर (एम एच १६/ ए वाय २३६) या पिकअपमध्ये ९० हजाराचे मांस व वाहन असे तीन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी वाहन चालक मुजफ्फर आयुब शेख (रा. खडकत , ता. आष्टी, जि. बीड) व मन्नान इब्राहिम शेख, (रा. अमरवाडा, अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर वाहनातील मांस कोणत्या प्राण्याचे आहे, याच्या तपासणीसाठी मंद्रूपचे पशुवैद्यकीय अधिकारी यांना नमुने देण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार प्रमोद असादे करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #मंद्रूप #पोलिस #मांस #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह खासदार संजय मंडलिक आणि सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची लागण
Next Article अटल निवृत्तीवेतन योजनेत चालू वर्षात 17 लाखांहून अधिक खाती उघडली; अशी आहे वर्गवारी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?