दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूपजवळ डंपर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून इतर दोन जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414855565289738240?s=19
यात संतोष नागप्पा शिंदे (वय 22,रा. शिवाजीनगर,चडचण,जि.विजयपूर) यांचा जागीच मृत्यु झाला तर कार्तिक राजकुमार भंडारी( वय १८)आकाश तुकाराम शिंदे( वय १७ , दोघे रा. चडचण) हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,संतोष,कार्तिक व आकाश हे तिघेजण क्रिकेट खेळून मंद्रूपवरून दुचाकी (के.ए.२८ ई.वाय.७९७६)वरून चडचणकडे निघाले होते. मंद्रूप -माळकवठे रस्त्यावरील खट्टे यांच्या शेताजवळील वळणावर समोरून येणा-या टिपरने यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यात दुचाकी चालक संतोष शिंदे हा जागीच ठार झाला तर कार्तिक व आकाश जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे, उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले,पोलीस हवालदार प्रमोद आसादे,विश्वास पवार व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414904533684084737?s=19
जखमीना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डाॅक्टरांनी संतोष शिंदे यास मयत झाल्याचे घोषित केले. यावेळी इतर दोघांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टिपर चालकाविरूध्द मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार प्रमोद आसादे हे करीत आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414917377150447626?s=19