Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतक-यांच्या मागण्यासाठी भाजपचा मंद्रुप तहसील कार्यालयावर मोर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेतक-यांच्या मागण्यासाठी भाजपचा मंद्रुप तहसील कार्यालयावर मोर्चा

Surajya Digital
Last updated: 2022/05/05 at 4:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

● महाआघाडीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

सोलापूर : वीज महामंडळाने लोडशेडींग बंद करावे, ग्रामपंचायतीच्या पाणी पंपांना पूर्ण वेळ वीज पुरवठा करावा, मंद्रुप एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्यात येणा-या शेतक-यांच्या शेतजमीनीस वाढीव किंमत मिळावी,  यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूपच्या अप्पर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. BJP marches on Mandrup tehsil office to demand farmers

तसे मागण्याचे निवेदन दिले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते.

यावेळी शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, भिमा नदीकाठच्या गावांमधील मंद्रुप एम. आय. डी. सी. साठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनीस वाढीव किंमत मिळावी, ८ तास वीज पुरवठा करण्यात यावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना परत कर्ज वाटप करण्यात यावे, भिमा नदीकाठावरील गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून बोटींची सोय करावी,

 

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी,  कॅनॉलला टेलएंड पर्यंत पाणी सोडण्यात यावे,  सिना नदीला पाणी टेलएंड पर्यंत सोडावे, अतिवृष्टी प्रलंबित अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रामप्पा चिवडशेट्टी,    हनुमंत कुलकर्णी,  मळसिद्ध मुगळे,  प्रशांत कडते, कलावती खंदारे , यतीन शहा  व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

□ महाआघाडीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

सध्याचे महाआघाडी सरकार शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करत आहे. भाजपच्या काळात असे प्रकार होत नव्हते. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आमच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या परिस्थितीस सरकार जबाबदार असेल, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #BJP #marches #Mandrup #tehsil #office #demand #farmers, #शेतकरी #मागण्या #भाजप #मंद्रुप #तहसील #कार्यालय #मोर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार जातीयवादी नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते जाती वाद करतात : रामदास आठवले
Next Article Prakash Ambedkar’s serious allegations भिडे गुरूजींच्या क्लीनचिटवरून प्रकाश आंबेडकरांचे जयंत पाटलांवर गंभीर आरोप

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?