खास प्रतिनिधी
सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येचे पाऊल हे भावनेच्या भरात अचानक उचलेले पाऊल नाही. याची पुष्टी करणार्या अनेक बाबी समोर येत आहेत. गेल्या महिनाभरापासून डॉक्टर कमालीचे अस्वस्थ होते, आणि त्यांनी ही ‘सल’ त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवली होती. ओळखीच्या अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया येथेच करायची की दुसरीकडे याचा निर्णय आपण घ्यावा, असे डॉ. शिरीष वळसंगकर सांगत होते. रुग्णांसाठी ही आश्चर्याची बाब होती. देण्या-घेण्याचे अनेक व्यापार डॉक्टरांनी गेल्या पंधरवाड्यात पुढाकार घेऊन संपविले होते. डॉ. शिरीष वळसंगकरांनी त्यांचे मृत्युपत्र सोलापुरातील नव्हे, तर सांगली येथील वकिलाकडून तयार करून घेतले होते, आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यात बदल करून घेतला होता. संशयित मनीषा मुसळे-माने हिचे प्रकरण हा ‘ट्रिगर’ होता, कारण हे प्रकरण घडायच्या खूप आधीपासून डॉक्टर अस्वस्थ होते, असे त्यांचे निकटवर्ती सांगत आहेत.
मनीषा मुसळेच्या केबिनची झडती
अन् मंगळवारी रात्री वेगळीच कुजबुज
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे अनेक तर्क-विर्तकांना जागा मिळत आहे. मंगळवार (ता.22) सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी साधारण सात तास वळसंगकर हॉस्पीटलची अक्षरश: झाडाझडती घेतली. यावेळी अनेकांचे जबाबदेखील त्यांनी नोंदवले. यादरम्यान संशयित मनीषा मुसळे- माने हिच्या केबीनच्या झाडाझडतीत सोने, चांदी आणि सह्यांचे काही व्हाऊचर्स सापडल्याची कुजबुज वळसंगकर हॉस्पीटल परिसरात मंगळवारी रात्री उशीरापर्यंत होती. मात्र या संदर्भात पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही.
चौकट
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचं पिच्चर होणार आज क्लिअर
धमकावणारी मनीषा मुसळे-मानेच, की सतावणारं अन्य कोण?
: पोलीस सांगणार थेटच
: उत्सुकता पोचेल शिगेला
सोलापूर : महाराष्ट्र हादवून टाकणार्या डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. शिवाय आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित म्हणून हॉस्पीटलची प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती अटकेत आहे. दरम्यान याच वळणावर डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येचं सगळाच पिच्चर बुधवार (ता.23) क्लिअर होणार आहे. यासंबंधी खुद्द सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी मंगळवार (ता.22) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तसा निरोप दिला आहे.
दरम्यान, तपास अधिकारी यांच्याकडून बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सगळी माहिती मिळणार आहे, तेव्हा धमकावणारी मनिषा मुसळे-माने हीच मारेकरी ठरणार की डॉ. वळसंगकरांना सतावणारं दुसरं कोणी? याचा उलगडा होणार आहे.
या संदर्भात लकडे म्हणाले, आज मंगळवारी संशयित आरोपीकडे पुन्हा एकदा सखोल विचारपूस केली आणि तपास करण्यात आलेला आहे. शिवा य वळसंगकर हॉस्पीटलला भेट देऊन चौकशी करण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आपल्याला तपास झाल्यावर उद्या देण्यात येईल, असे त्यांनी निरोप नमुद केले आहे.
बहुचर्चित डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, मित्र परिवार, निकटवर्तीय तसेच नातेवाईक यांच्याकडून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. संबंधितांकडून हवाला घेऊन प्रसारमाध्यमेदेखील ती माहिती प्रसिद्ध करीत आहेत, प्रसारीत करीत आहेत. डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्यावरुन मनीषा मुसळे-माने हिच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल असला तरी त्यांच्या आत्महत्येला कौटुंबिंक कलह कारणीभूत आहे, त्या पार्श्वभूमीवर, डॉ. वळसंगकरांची अत्यंत जवळकची नातेवाई हीच त्या घटनेला कारणीभूत असल्याचा दावा डॉ. वळसंगकर प्रेमींकडून केला जात आहे. हे सगळे लक्षात घेता, पोलीस आज काय नेमकी माहिती देतात, शिरीष सरांची मारेकरी मनीषा की नातेवाईकांपैकी दुसरे कोणी? याची उत्सुकता शिगेला पोचणार आहे.