Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनीषाचा तपास संपला; खरा सुत्रधार कधी समोर येणार?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मनीषाचा तपास संपला; खरा सुत्रधार कधी समोर येणार?

admin
Last updated: 2025/04/26 at 3:41 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

तपासलाबद्दल पोलिसांनी एवढी गोपनियता का बाळगली? कोणाला वाचवायचे प्रयत्न?

खास प्रतिनिधी
सोलापूर : प्रसिद्ध मेंदू आजार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणातील संशयित मनीषा मानेचा तपास सदर बझार पोलीस ठाण्याच्या टिमने संपविल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी (ता.25) तपासअधिकार्‍यांनीच मनीषा माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यावरुन हे स्पष्ट होत आहे.तथापि, मनीषा मानेचा तपास संपला. मात्र डॉक्टरांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला खरा सुत्रधार अर्थात मास्टमाईंड कधी समोर येणार, याबद्दलचे औत्सुक्य तमाम सोलापूर शहर-जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांसह डॉक्टरांचे रुग्ण असलेल्या परदेशातील रुग्णांनादेखील आहे.
विशेष म्हणजे डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणाच्या तपासाबद्दल पोलिसांनी एवढी गोपिनियता का बाळगली? याप्रकरणात पोलिसांना नेमके कोणाला वाचवायचे आहे,

डॉक्टरांच्या आत्महत्येला ‘गृहकलह’ कारणीभूत असताना या दिशेने पोलिसांचा तपास होताना दिसत नाही, गृहकलसह हा विषय पोलीसांनी तपासातून बाजूला केल्याने तमाम डॉ. वळसंगकर प्रेमींमधून पोलिसांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. समाजमन पोलिसांच्या विरुद्ध आगपाखड करीत आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल खर्‍या कारणांचा उलगडा होत नसल्याने ‘जनतेच्या कोर्टात ‘खाकी’वर्दी दोषी ठरत आहे.

जगविख्यात मेंदू विकार तज्ज्ञ आणि सोलापूरला मेडकल हबचा दर्जा मिळवून देण्यात अत्यंत मोलाचे योगदान देतानाच, हजारो-लाखो मेंदू रूग्णांचे ‘देवमाणूस’ ठरलेल्या डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येला आठ दिवस उलटून गेले. त्यांचे चिरंजीव डॉ. अश्‍विन यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी मनीषा माने हिला संशयित आरोपी करण्यात आले. साधारण सहा दिवसांपासून केवळ ना केवळ मनीषा हिचाच तपास सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडेंच्या टिमकडून सुरु आहे.

डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येबद्दल वेगवेगळी आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर येत असताना तपास अधिकार्‍यांकडून या माहितीच्या दिशेने तपास का होत नाही, यावरुन डॉक्टरप्रेमींनी आता पोलिसांच्या एकूण तपासाच्या भूमिकेवर संशय घ्यायला सुरुवात केली आहे, त्याला पुष्टीदेखील मिळत आहे, कारण या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने, पोलिसांकडून माहिती पद्धतशिररित्या दडवली जात आहे. मागच्या सहा-सात दिवसांत पोलिसांनी तपासाबद्दल अपेक्षित माहिती देण्यासाठी एकदाही तोंड उघडलेले नाही. तपास अधिकारी अजित लकडे किंवा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पोलीस उपायुक्त किंवा पोलीस आयुक्त यांनीदेखील माहितीसंदर्भात मूग गिळून बसण्याची भूमिका वळवली आहे, त्यामुळे पोलिसांवरचा संशय बळावत आहेत.

मनीषाचा गृहकलाचा मुद्दा पोलिस का घेत नाही मनावर? संशयित मनीषा ही डॉ.शिरीष वळंगकर परिवारात मागच्या साधारण 30
वर्षांपासून आहे. त्यामुळे तिला या परिवारातील खडान्खडा माहिती आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येच्या प्रकणात मनीषा हिने कौटुंबिक कलहाचा मुद्दा आहे. मात्र पोलिसांनी या महत्त्वाच्या मुद्याला बगल दिल्याचे मानले जात आहे.कौंटुंबिक कलहाचा मुद्दा बाजूला करुन पोलीसांना खरा सुत्रधार समोर आणायचा नाही का, संशयित मनीषा माने हीच खरी मारेकरी ठरवायची, असा प्री प्लॅन पोलिसांचा काय ठरला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस तपासादरम्यान मनीषा हिच्या गृहकलहाबद्दल सांगताना तिचे तोंड जाणीवपूर्वक बंद करण्यात आले आहे का, असाही संशयित व्यक्त केला जात आहे.

जबाब नोंदविण्याला ‘आक्षेपा’चा वास हॉस्पिटलमधील ठराविक जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, जे संशयित मनीषा हिच्या विरुद्ध आहेत. मात्र हॉस्पिटलमधील मनीषा समर्थक तसेच डॉ. शिरीष वळसंगकर यांचे चाहते, मित्र परिवार, शेजारी यासंबंधितांचे घटनेच्या अनुषंगाने जबाब का घेतले जात नाहीत. तपास अधिकार्‍यांच्या जबाब नोंदविण्याला डॉ. शिरीष वळसंगकर प्रेमींच्या आक्षेपाचा वास लागत आहे.

डॉ.अश्‍विन अन् शोनल यांच्या जबाबाची लपविली माहिती डॉ. अश्‍विन आणि डॉ. शोनल वळसंगकर यांचे जबाब तपास अधिकार्‍यांनी नोंदवले आहेत. संबंधितांकडे याबद्दल माहिती मागितली असता त्यांच्याकडून ती दिली जात नाही. या दोघांचेही जबाबाची माहिती लपविली जात असल्याची वस्तुनिष्ठ स्थिती आहे.

संशयित आरोनी मनीषा हिचे वकील
ऍड.प्रशांत नवगिरेंनी नव्याने उपस्थित केलेले मुद्दे
– डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येच्या केसमध्ये पोलिसांकडून होईना वस्तुनिष्ठ, अपेक्षित तपास
– डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणात खर्‍या कारणांचा उलगडा होईना
– संशयित मनीषा माने हिला दोषी ठरवत प्रकरण क्लोज करण्याचा प्रकार
– गृहकलहाची बाब तपास अधिकार्‍यांनी कोर्टापुढे आणलीच नाही
– डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल खर्‍या बाबी कोर्टासमोर आणल्या गेल्याच नाहीत
– मनीषा विरुद्ध आता तक्रार देणार्‍यांनी डॉक्टरांच्या आत्महत्येनंतरच का दिली तक्रार?
– खरोखरच मनीषाकडून त्रास झाला असेल तर तक्रारदारांपैकी कोणीच का केली नाही आत्महत्या?
-डॉ. शिरीष वळसंगकरांनीच कशी केली आत्महत्या
– तपास अधिकार्‍यांनी तपासात काय रेकॉर्ड केलं ते दोषारोप पत्रांच्या प्रति आल्यानंतर कळेल

– पोलिसांनी केलेल्या तपासाचे मुद्दे आणि आमच्याकडील पुरावे याआधारे जोरदार युुक्तीवाद करणार

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article : मनीषा मानेचे काय झाले ?गुन्ह्याचा तपास वेगाने, पण समाजमनाचा संताप का?
Next Article बाजार समितीच्या कारभार्‍यांसाठी उद्या मिळणार कौल साडेपाच हजार मतदार ठरविणार अब किसकी की बारी?

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?