Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Surajya Digital
Last updated: 2022/03/17 at 7:40 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीसह केंद्रीय मंत्र्यांना आमंत्रण नाही

नवी दिल्ली : भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. हा शपथविधी सोहळा हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे झाला. शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे 40 एकर जागेवर मोठा मंडप टाकण्यात आला. मान यांच्या शपथविधी कार्यक्रमात हेलिपॅड आणि 25 हजार वाहनांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमात कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर दहा हजार पंजाब पोलीस तैनात करण्यात आले होते. Bhagwant Mann sworn in as Punjab’s 25th Chief Minister

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.

फक्त मीच नाही तर पंजाबचे तीन कोटी लोकही माझ्यासोबत शपथ घेतील. भगतसिंगांची स्वप्ने आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायची आहेत. 16 मार्चला आपण त्यांची विचारसरणी अंमलात आणू. मी एकटाच मुख्यमंत्री झालो नाही. तुम्ही सगळे मुख्यमंत्री झालात. आता तुमचेच सरकार असेल, असेही भगवंत मान म्हणालेत. आम आदमी पक्षाने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे.

□ शपथविधी सोहळा खर्चावर टीका

या शपथ ग्रहण सोहळ्यावरुन दिल्लीतील भाजपचे आमदार परवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीवर टीका केली आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाखाली आपचे जाहिरातींचे राजकारण वाढत आहे. 57 लाखांच्या रोड शोनंतर, आप ने शपथविधी सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून 2 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे वर्मा म्हणालेत.

□ भगवंत मान यांच्याविषयी…

भगवंत मान यांनी कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांचा 1973 मध्ये संगरूच्या सतोज गावात जन्म झाला. त्यांनी 2011 मध्ये मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब पीपल्स पार्टीसोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी लेहरागागा मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही.

मात्र ते 2014 मध्ये आपमध्ये सामील झाले आणि संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजयी झाले. जेव्हा त्यांनी पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे सुखदेवसिंग धिंडसा यांचा पराभव केला, त्यावेळी पंजाबच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले. यानंतर मान यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला.

 

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #BhagwantMann #sworn #Punjab's #25th #ChiefMinister, #भगवंतमान #पंजाब #25व्या #मुख्यमंत्रीपद #शपथ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सलमान खान आता टॉलिवूडमध्ये झळकणार
Next Article सोलापुरात ‘झुंड’ चित्रपटाचे कथानक विजय बारसेंचा गौरव

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?