Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो – उदयनराजे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो – उदयनराजे

Surajya Digital
Last updated: 2020/11/29 at 3:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सातारा : देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी मराठा आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांसह भाजप नेत्यांनी केला होता. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  उदयनराजे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर ते पुढं न्यावं. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी बोलताना भोसले यांनी जातीचं राजकारण करायचं असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा,’ असा इशाराच राज्यकर्त्यांना दिला आहे. ‘आरक्षणाचा प्रश्न हा सुटणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून सध्या होणाऱ्या प्रवाशांमध्ये देखील मराठा विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवण्यात याव्यात’ अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे.

ते म्हणाले की, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का विचार केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. कारण याला सगळेच जबाबदार आहेत. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

इतरांचं आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण मागत नाही. सर्वधर्म समभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं ते म्हणाले. इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू, असंही ते म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #देवेंद्रफडणवीसांच्या #हातीसत्ताद्या #मीआरक्षण #मिळवूनदेतो #उदयनराजे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दोन मजली गोठ्यात 60 म्हशींचा सांभाळ करत ‘श्रद्धा’ लावतीय कुटुंबाला ‘हातभार’
Next Article हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ करण्याच्या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर केसीआर यांचा ‘हल्लाबोल’

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?