सोलापूर : कोरोनामुळे सर्वाचेच मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बंद पुकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. गोरगरीब शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे लोकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंग पाळून साखळी मोर्चा काढणे, गनिमी काव्याने आंदोलने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आमची लढाई सरकारशी आहे. न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी सरकारवर दबाव वाढवू, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, दास शेळके, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, मिलिंद भोसले, विजय पोखरकर, अमोल भोसले, वाय.पी. पवार, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणात शासन कुठे कमी पडले याची समिक्षा होणे आवश्यक आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने आरक्षणासाठी आत्महत्या करणे, जीव धोक्यात घालू नये. समाजातील आणखी बळी आपल्याला नको आहेत. आपल्याला ही लढाई नेटाने पुढे न्यायची आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यावी, असे आवाहन बैठकीत केले.