Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात बुधवारी उपोषणाला बसण्याचे आवाहन, सोलापुरातही झाली बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात बुधवारी उपोषणाला बसण्याचे आवाहन, सोलापुरातही झाली बैठक

Surajya Digital
Last updated: 2021/02/08 at 10:43 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे. यामुळे मराठा समाजाने आता पुन्हा एकजूट दाखवून शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात केले.

मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असावी? यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे काल रविवारी मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी माऊली पवार, राम गायकवाड, नगरसेवक अमोल शिंदे, किरण पवार, दास शेळके, आनंद जाधव, प्रताप कांचन आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे. तसेच ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप केला. पाटील म्हणाले, विद्यमान सरकार सध्या मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे, तर यामध्ये मराठ्यांचा पक्ष म्हणूनही काही पक्ष सामील आहेत. त्यांनीही आता समाजाकडे लक्ष द्यावे, असा अप्रत्यक्ष टोला नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

विद्यमान सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करून समाजावर अन्याय केला आहे. तसेच त्यासाठी एक रुपयाचीही आर्थिक तरतूद केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शासनाला मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात उपोषण करण्यासाठी मराठा समाजाने सज्ज रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Maratha #Reservation #solapur #meeting, #मराठा #आरक्षणासाठी #प्रत्येकगावात #उपोषण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनशांतीसाठी धडाकेबाज तुकाराम मुंढे आर्ट ऑफ लिव्हिंग’ मध्ये ?  पुन्हा चर्चेत
Next Article वैरागमध्ये लाठीमार, तणाव; विनापरवाना पुतळा बसवला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?