Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, विविधांगी भूमिका साकारल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, विविधांगी भूमिका साकारल्या

Surajya Digital
Last updated: 2023/03/18 at 10:34 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज निधन झाले आहे. भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. ही बातमी समजताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. Veteran actor Bhalchandra Kulkarni passed away, Kolhapur Marathi Film Corporation who played various roles

 

‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’ यासारख्या 300 पेक्षा जास्त चित्रपटात भालचंद्र कुलकर्णी यांनी काम केले होते. भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमात खूप मोठे योगदान दिले आहे.

 

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात, अशा 300 हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले होते. भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

Renowned Marathi actor Bhalchandra Kulkarni passes away in Kolhapur. He was 88. Worked in over 250 Marathi and some Hindi movies spanning over several decades. Known for deep voice, emotive dialogue delivery. @TOIPune @timesofindia pic.twitter.com/ZDmZeSiUzE

— Abhijeet Patil (@abhijeetpTOI) March 18, 2023

 

आज दुपारी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हापूर- कळंबा येथील शिवप्रभू नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा त्यांचा अखेरचा पुरस्कार ठरला. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.

 

भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं त्यांच्या चित्रित झाले होते. हे गाणे खूप गाजलं होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

 

 

You Might Also Like

मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत

दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस

पीक विमा कंपनीच्या गैरव्यवहारावर शेतकरी संतप्त

तळेगाव दशासरमध्ये घरकुल घोटाळा – १८ बोगस प्रकरणांचा पर्दाफाश

TAGGED: #Veteran #actor #BhalchandraKulkarni #passedaway #Kolhapur #Marathi #Film #Corporation #played #variousroles, #ज्येष्ठअभिनेते #भालचंद्रकुलकर्णी #निधन #कोल्हापूर #विविधांगी #भूमिका #साकारल्या #मराठी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, कुर्डुवाडीतील दुर्दैवी घटना
Next Article आमदारांची लक्षवेधी विद्यापीठातील भ्रष्टाचारावर; कुलगुरूंची चौकशी होणार निवृत्तीच्या उंबरठ्यावर

Latest News

सोलापूर विद्यापीठ : नापास विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश
सोलापूर August 16, 2025
सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सोलापूर August 16, 2025
चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा
देश - विदेश August 16, 2025
रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
देश - विदेश August 16, 2025
मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत
महाराष्ट्र August 16, 2025
बीसीसीआय करणार देशांतर्गत क्रिकेट नियमांमध्ये बदल – गंभीर दुखापतीत बदली खेळाडूला संधी
देश - विदेश August 16, 2025
दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?