Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यभरातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा उद्या मातोश्रीवर पायी मोर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज्यभरातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा उद्या मातोश्रीवर पायी मोर्चा

Surajya Digital
Last updated: 2020/12/01 at 3:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षित विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढणार आहेत. नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हे विद्यार्थी उद्या बुधवारी पायी मुंबईकडे निघणार आहेत.

मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे विद्यार्थ्यांचे नियोजन आहे. शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विविध मागण्या घेऊन विद्यार्थी २ डिसेंबरला नगरहून पायी मुंबईकडे निघणार आहेत. तेथे मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मागण्या ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने आता मातोश्रीवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. एक डिसेंबरलाच हा मोर्चा निघणार होता, मात्र या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने तो एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य समन्वयक यशवंत तोडमल यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पायी मोर्चात येता येणार नाही. ज्या दिवशी भेट मिळेल, त्या दिवशी त्या वाहनाने मुंबईत येणार आहेत. विद्यार्थी मात्र, पायी जाणार आहेत. पहिल्या दिवशी घरून डबा घेऊन जाणार असून त्यानंतर वाटेत गावोगावी थांबून लोकांना आपल्या प्रश्नांची माहिती देत पुढे वाटचाल करणार आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने वाटेत गावकऱ्यांनीच आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

* या आहेत मागण्या

आंदोलक विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. नव्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कामांचे कंत्राट मिळण्यासाठी नियम सुलभ करणे, सहा लाखांपर्यंतची कामे विना निविदा उपलब्ध करून देणे, महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्यावेळी होणारे गैरप्रकार थांबविणे, त्यासंबंधी आलेल्या तक्रारींनुसार संबंधितांची चौकशी करणे, स्थापत्य आणि वीज अभियंत्यांना कत्रांटदार नोंदणीसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, औषध निर्माण विभागाच्या विद्यार्थ्यांना मेडीकल दुकान सुरू करण्यासाठी सरकारने कर्ज सुविधा योजना सुरू करावी, अभियांत्रिकीचा व्यावसायिक दर्जा रद्द करावा आणि त्याचे खुल्या प्रवर्गासाठीचे प्रवेश पाच पेक्षा जास्त नसावेत, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील भरतीसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांना कामे मिळवून देताना लाचखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, महाविद्यालयातील अधिव्याख्याता आणि प्राध्यापक भरतीसाठीची नेट परीक्षेची अट रद्द करावी, अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #राज्यभरातील #उच्चशिक्षित #विद्यार्थ्यांचा #उद्यामातोश्रीवर #पायीमोर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिक्षक – पदवीधरसाठी आज मतदान, पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान
Next Article बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी उद्या होणार पहिली बैठक; योगी सरकारच्या हालचाली

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?