Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चांगले मार्क, कंपनीत प्लेसमेंट देण्याची हमी देत प्रोफेसरने केली विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

चांगले मार्क, कंपनीत प्लेसमेंट देण्याची हमी देत प्रोफेसरने केली विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 5:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : युनिवर्सिटीतील विद्यार्थींनींना चांगले मार्क आणि नोकरीत प्लेसमेंट देण्याची हमी देत एका प्रोफेसरने अनेक विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केलीय. अशी तक्रार कोणा पीडित विद्यार्थिनीनी केली नसून प्रोफेसर महाशयाच्या धर्मपत्नीने केली आहे. पुरावादाखल तिने ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे. हा प्रकार पश्चिम बंगालमधील युनिवर्सिटीत घडला आहे.

पश्चिम बंगालमधील युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या प्रोफेसरवर गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. या प्रोफेसरची एक ऑडिओ क्लीप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमधील संवादातून त्यांनी केलेले अश्लिल चाळे उघडकीस आले आहेत, ते मुलींचा पाठलाग करतात, ही ऑडिओ क्लीप त्यांच्या पत्नीची आहे. ज्यात ती प्रोफेसरच्या अश्लिल वागणुकीबाबत सांगत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ज्या प्रोफेसरवर हे आरोप लागलेले आहेत ते युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी साहित्याचे धडे देतात. या प्रोफेसरच्या पत्नीच्या हवाल्याने दावा केला आहे की, गेल्या २० वर्षापासून ते विद्यार्थींनाचा पाठलाग करत त्यांचे लैगिंक शोषण करत आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये त्यांच्या पत्नींनी मुलींचीही नावं घेतली आहेत. शारीरिक सुखाची मागणी करत त्यांना परीक्षेत मार्क्स देण्याचं लालच देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जी मुलगी प्रोफेसरची मागणी पूर्ण करते तिला परीक्षेत चांगले मार्क्स आणि कंपनीत प्लेसमेंट देण्याची गॅरेंटीही दिली जाते.

ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी युनियनकडून प्रोफेसरविरोधात कुलगुरुंकडे तक्रार देण्यात आली आहे. यानंतर विद्यापीठाने यावर कायदेशीवर कारवाई करु, असं आश्वासन दिलं आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, अनेक विद्यार्थींनीसोबत प्रोफेसरांचे अफेअर सुरु आहेत. या प्रकारामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. या ऑडिओ क्लीपबाबत योग्य चौकशी करुन यातील सत्य समोर आणावं, असं म्हटलं आहे.
या प्रकरणावर भाष्य करण्यास प्रोफेसर यांनी नकार दिला आहे.

“हे प्रकरण इंटरनल कम्प्लेंट कमिटीकडे सोपवण्यात आलंय. याच्या प्रमुखपदी कायदे विभागाच्या महिला शिक्षिका यांची नेमणूक केली आहे. त्यासोबतच आतापर्यंत आमच्याकडे एकाही विद्यार्थीनीने तक्रार केलेली नाही. ९ सदस्यीय इंटरनल कम्प्लेंट कमिटी चौकशी करणार आहेत”

निमई चंद्रा सहा, कुलगुरु

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #प्रोफेसर #मार्कप्लेसमेंट #शरीरसुख #युनिवर्सिटी #कोलकाता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात आजच्या अहवालात तीन मृत्यू तर 56 रूग्ण वाढले; बाधिताची संख्या पाच हजाराच्या घरात
Next Article राम मंदिर भूमीपूजन धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे; ई भूमिपूजन कशाला हवं?

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?