Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गणपतीच्या आगमनादिनी सोलापुरात मश्रूम गणपती मंदिराचा 14 लाखाचा सोन्याचा कळस चोरीला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गणपतीच्या आगमनादिनी सोलापुरात मश्रूम गणपती मंदिराचा 14 लाखाचा सोन्याचा कळस चोरीला

Surajya Digital
Last updated: 2022/08/31 at 1:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : देशभर गणेशोत्सव साजरा केला जात असतानाच सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपतीचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. यामुळे भाविक संतप्त झाले आहेत. सोलापूर – तुळजापूर महामार्गावर हिप्परगा येथे असलेल्या मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील सोन्याचा कळस बुधवारी (ता. 31) पहाटे चोरीला गेला. या कळसाची अंदाजे किंमत 14 लाख रुपये आहे. 14 lakh gold crown stolen from Mashrum Ganpati temple in Solapur on the day of Ganpati’s arrival

मश्रूम गणपतीचा 25 किलो वजनाच्या सोन्याचा कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे मंदिरात आल्याने चोरी झाल्याचे समजले. दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून भेट देऊन पाहणी केली. या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.

सोलापूर जिल्ह्यात असलेले हिप्परगामधील हे मश्रूम गणपतीचे मंदिर सिद्धरामेश्वरांनी स्थापन केले आहे. नंतरच्या काळात भाविकांनी मिळून या गणेश मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचवेळी गणपती मंदिरावरही सोन्याचा कळस लावण्यात आला होता.

हिप्परगा गावामध्ये रोडलगत मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरावर भाविकांच्या योगदानातून २४ तोळे सोन्याचा कळस बसवण्यात आला होता. मंदिराच्या वरच्या बाजूला चढून चोरट्यांनी हा कळस चोरला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची मंदिरासमोर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोलापूर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. डॉग स्कॉड मागविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू करायला सुरूवात केली. या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच मंदिरावरील कळस २०१६ साली चोरीला गेला होता. आता पुन्हा कळस चोरीला गेल्याचे मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तक्रारीनुसार, संजय पतंगे हे मश्रूम मंदिराचे पुजारी असून ते देखरेख देखील करतात. 30 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन ते घरी गेले. मंगळवारी मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी श्री मश्रूम गणपती मंदिरावरील स्थापित असलेला अंदाजे 25 किलो वजनाचा पंचधातूचा कळस चोरीला गेला.

मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसऱ्यांदा कळस चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #14lakh #goldcrown #stolen #Mashrum #Ganpati #temple #Solapur #Ganpati's #arrival, #गणपती #आगमनादिनी #सोलापूर #मश्रृम #गणपती #मंदिर #14लाखाचा #सोने #कळस #चोरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर तालुक्यात 16 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’
Next Article साखर कारखानदारी : नितीन गडकरी यांच्यामध्ये वास्तव सांगण्याची धमक

Latest News

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
देश - विदेश October 14, 2025
टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने
महाराष्ट्र October 14, 2025
उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?