रामदास आठवले यांनी सांगितले की, मायावतींच्या बसप पक्षाची स्थिती सध्या कमकुवत असून, केवळ एक आमदार व एक खासदार शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे, ‘रिपाइं-ए’ गट हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा खरा राजकीय पक्ष आहे. मायावती यांचा पूर्वीचा करिष्मा आता उरलेला नाही, पण तरीही त्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन ‘रिपाइं’ गटांमध्ये एकात्मता निर्माण करावी, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
राज्यात ‘रिपाइं’चे अनेक गट कार्यरत आहेत, आणि त्यामध्ये आठवले यांचा ‘रिपाइं-ए’ हा प्रमुख गट मानला जातो. सध्या आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि भाजपच्या महायुतीत सामील असल्याचा त्यांचा दावा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या गटाला एकच जागा दिली होती, ती देखील भाजपच्या चिन्हावर लढवण्याच्या अटीसह होती. सध्या त्यांच्या गटाचा राज्यात कोणताही आमदार किंवा खासदार नाही.
अशा स्थितीत, त्यांनी उत्तर प्रदेशातील चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींना ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन करून चर्चेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us
Sign in to your account