Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पॉईंटमन मयुर शेळकेने वाचवला चिमुकल्याचा जीव, होतोय कौतुकाचा वर्षाव, पहा व्हिडिओ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पॉईंटमन मयुर शेळकेने वाचवला चिमुकल्याचा जीव, होतोय कौतुकाचा वर्षाव, पहा व्हिडिओ

Surajya Digital
Last updated: 2021/04/22 at 6:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. त्या मुलाची अंध आई चाचपडत होती. त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने आली, त्यावेळी जीवाची पर्वा न करता मयुर शेळके याने रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता.

#WATCH | Maharashtra: Railway staff at Central Railway office clap for pointsman Mayur Shelkhe, who saved the life of a child who lost his balance while walking at platform 2 of Vangani railway station & fell on railway tracks, on 17th April. Shelkhe was also felicitated. (19.04) pic.twitter.com/6L8l3VmLlQ

— ANI (@ANI) April 20, 2021

या घटनेनंतर काही तासातच या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. वांगणी रेल्वे स्थानकात झालेल्या या घटनेच्या व्हिडियोची दखल रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वानी घेत मयूर शेळकेचे कौतुक केले तसेच त्याला रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनेही मयुर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे. तसे ती बाईक भेटही देण्यात आली. बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा मयूर शेळकेच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे.

रेल्वेने दिलेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला – रायगड वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. मयुरला रेल्वेकडून या 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. या बक्षिसाची अर्धी रक्कम 25 हजार रुपये अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याच्या शौर्यासह माणुसकीचेही कौतुक होत आहे.

Mayur Shelke didn’t have a costume or cape, but he showed more courage than the bravest movie SuperHero. All of us at the Jawa family salute him. In difficult times, Mayur has shown us that we just have to look around us for everyday people who show us the way to a better world.. https://t.co/O66sPv0A3k

— anand mahindra (@anandmahindra) April 20, 2021

मयूर शेळके यांचा रेल्वे विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे. तसेच, 50 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांना रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक करत, आपण केलेलं काम अतुलनीय असल्याचं म्हटलंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलंय.

I'll give half of the amount, given to me as token of appreciation, for that child's welfare & education. I came to know that his family isn't financially strong. So I decided this: Mayur Shelkhe, pointsman who saved a child who fell on tracks at Vangani railway station on 17.04 pic.twitter.com/IWdacY0DFf

— ANI (@ANI) April 22, 2021

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनीही मयूर शेळकेंच कौतुक केलंय. मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोट किंवा टोपी नाही, तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केलंय, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.

वीज दरवाढीचा झटका, जास्त पैसे मोजावे लागणार https://t.co/Kqylq1VhLl

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

* मयुरला मुंबईला येण्याचे निमंत्रण 

पॉईंटमन मयूर शेळके याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या लवकरच सत्कार करणार आहेत. मयूर शेळके याच्या या धाडसी कृतीबाबत महापौर पेडणेकर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या त्याचे अभिनंदन करणार होत्या. मात्र त्याचा मोबाईल नंबर त्यांच्याजवळ नव्हता. परंतु सोमवारी रात्री १२ नंतर महापौरांना मयूरचा मोबाईल नंबर उपलब्ध झाला. त्यांनी तात्काळ मयूरला फोन करून त्याला आपली ओळख दिली व त्याचे अभिनंदन केले. त्यामुळे मयूरला एक सुखद धक्काचं बसला असावा.

रात्र जास्त झाल्याने महापौर व मयूर यांना अधिक संभाषण करता आले नाही. मात्र महापौरांकडे याबाबत विचारणा केली असता, आपण त्याच्या या जिगरबाज कृती बद्दल त्याचा सत्कार करणार असून त्याला मी मुंबईत महापौर बंगल्यावर येण्याबाबत निमंत्रण दिल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

मेकअप खराब होईल म्हणून मास्कचं लावला नाही; नवरीचा मेकअप पडला महागात https://t.co/UzwGKmgq3h

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Mayurshelke #relway #children #poinetsman, #जीवाची #पर्वा #मयूरशेळकेने #वाचवला #चिमुकल्याचा #जीव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वीज दरवाढीचा झटका, जास्त पैसे मोजावे लागणार
Next Article विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?