मुंबई : आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकार गंभीर असून सर्वांना सहभागी करून घेत कायदेशीर लढाई अधिक चिवटपणे लढू व मार्ग काढू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी आपण गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आली आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कोरोनाचे संकटच नाही, तर इतरही वादळे आहेत. राजकीय वादळ सोडून द्या; मी अशा वादळांना घाबरत नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
* ‘या’ नागरिकांना मिळणार उपचार
१५ सप्टेंबरपासून या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात आरोग्य, महसूलसह इतर शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके नेमण्यात येणार असून ही पथके किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.