Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माझ्यावर आरोप करणारेच पळून गेले- अनिल देशमुख
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

माझ्यावर आरोप करणारेच पळून गेले- अनिल देशमुख

Surajya Digital
Last updated: 2021/11/01 at 6:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणातील आरोपी ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘अजूनही मला कोर्टात जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. मात्र आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात आलो आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंह आज कुठे आहेत. बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत.

माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, आज सोमवारी ते स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे व्हिडीओ देखील ट्वीट केला. यात अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणाती आरोपी सचिन वाझेवर गंभीर आरोप केलेत. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही हल्ला चढवला.

ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले. त्या दोन्ही वेळा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालोय,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

pic.twitter.com/F2ChAGKEHi

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये हजर होईन.

अनिल देशमुख म्हणाले, “परमबीर सिंह यांचा सहकारी एपीआय सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. वाझे याआधी देखील अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली. त्याला सरकारी नोकरीतून काढल्यावर त्यानं माझ्यावर आरोप केले.आज पोलीस खात्यातील अनेक अधिकारी, व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.”

अनिल देशमुख म्हणाले, “परमबीर सिंह आणि सचिन वाझेसारख्यांच्या आरोपांवर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. ३० वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला आणि सचिन वाझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आज खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे, त्यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे, ही दुःखाची गोष्ट असल्याचे म्हणाले.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #one #accused #ranaway #Anildeshmukh, #आरोप #करणारे #पळून #अनिलदेशमुख #ईडी #हजर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवाळी- महागाईचा बॉम्ब फुटला, व्यावसायिक गॅस सिलिंडर २६५ ने महागला
Next Article युवासेनेचा मोहोळमध्ये बैलगाडी मोर्चा, केंद्र सरकारच्या महागाईयुक्त धोरणाचा निषेध

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?