Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ करमाळ्यात वैद्यकीय सेवा बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ करमाळ्यात वैद्यकीय सेवा बंद

admin
Last updated: 2024/08/18 at 1:27 PM
admin
Share
3 Min Read
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
SHARE

 

करमाळा,  – कोलकात्यामधल्या आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) द्वारे शनिवारी राज्यभर ‘ओपीडी’ सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज इंडियन मेडिकल असोसिएशन, करमाळा शाखा, करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, करमाळा मेडिकोज गिल्ड या संघटनांच्या वतीने या बंदला पाठिंबा देऊन नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढला.
याबाबत तहसील कार्यालय करमाळा आणि करमाळा पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा कर्तव्यावर असताना निर्दयपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली, या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
या गुन्हयाच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अवशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेल्या जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
त्यामुळे या गुन्ह्यातील पीडितेच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात करमाळ्यातील सर्व डॉक्टर संघटना १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदचे आवाहन करत आहेत. या बंद दरम्यान केवळ अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
शनिवारी सकाळी पोथरे नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मूक मोर्चात शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स सहभागी झाले होते. शहरातील महिला डॉक्टरांची या मोर्चाला लक्षणीय उपस्थिती होती. पोथरे नाका-जय महाराष्ट्र चौक-सुभाष चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-गायकवाड चौक-महात्मा फुले चौक या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. नायब तहसीलदार माजिद काझी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट

सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत

मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next Article पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला मान्यता

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?