Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत

admin
Last updated: 2025/06/10 at 6:54 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना

गेल्या सोळा वर्षांची परंपरा

सिंधुदुर्ग, 10 जून (हिं.स.)। गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.

सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातॊ. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी कामना करतात. वडाची पूजा करतात. पण स्त्री आणि पुरुष हि संसार रथाची दोन चाकं आहेत. म्हणून जस एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते तसं मग पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये, असा विचार करून कुडाळ मध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि मित्रमंडळी गेली १५ वर्ष आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरं करत आहेत. या व्रताचं यंदाच हे सोळावं वर्ष आहे. आज सुद्धा वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला सांगणं करून सर्वांच्या वतीने उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला.

आपली पत्नी दरवर्षी आपल्या दिर्घायूसाठी वट वृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितलं. हि परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी. आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा प्रा. अरुण मर्गज यांनी व्यक्त केली.

महिला नेहमीच वटपौर्णिमा साजरी करतात पण कुडाळ मधले पुरुष गेली १६ वर्ष हे व्रत आपल्या पत्नीसाठी करताहेत ते तेवढंच कौतुकास्पद आणि सर्वानी आदर्श घेण्यासारखं आहे असं सौ. अमृता गाळवणकर यांनी सांगितलं.

यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ.अमृता गाळवणकर यांनी एकत्र वट वृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप, सुरेश वरक सहभागी झाले होते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रोहित शर्माचं एकदिवसीय कर्णधारपद धोक्यात ?
Next Article केरळमध्ये कोरोनानंतर आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?