Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार पुन्हा पावसात भिजले, वयाचा उल्लेख केलात तर महागात पडेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार पुन्हा पावसात भिजले, वयाचा उल्लेख केलात तर महागात पडेल

Surajya Digital
Last updated: 2023/07/08 at 9:36 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

नाशिक : 2019 विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी साताऱ्यात कोसळत्या पावसात घेतलेली सभा खूप गाजली होती.  Sharad Pawar got wet in the rain again, if age is mentioned it will be expensive Chhagan Bhujbal came to Nashik त्या एका सभेने राज्यातील सगळे सत्ताकारण बदलून टाकले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पावसात भिजले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांसह अनेकांनी त्यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा इतिहास घडणार का अशी चर्चा रंगली आहे.

 

शरद पवार आज दुपारी येवला बाजार समितीच्या पटांगणात सभा घेतली. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भविष्याबाबत चिंता वाटत असल्याचे सांगत शरद पवार यांनी गर्भित इशारा दिला होता. भुजबळ यांचा भविष्यात येवल्यात पराभव करण्यासाठी शरद पवार गटाकडून रणनीती आखण्यात येत असल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांचा नाशिक दौरा नियोजित असून भुजबळांच्या मतदार संघात सभा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. पवार यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावरही भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, काही लोकं म्हणतात, तुमचं वय झालंय. वय झालं हे खरं आहे. पण, निवृत्त व्हा. असं म्हणू नका. वयाच्या भानगडीत पडू नका. गडी काय हे पाहिलचं नाही. काय टीका करायची ‌ती करा. पण वय आणि व्यक्तिगत टीका करू नका, असंही शरद पवार यांनी सुनावलं. छगन भुजबळ यांना संधी दिली. पण, ते सोडून गेले. त्यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझं असेसमेंट चुकलं यात मी दुसऱ्याला दोष देत नाही. जे आमच्यापासून बाजूला गेले त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. कारण काय करायचं ते लोकं ठरवतील.

 

मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे…
मिटने वाला मैं नाम नहीं…
तुम मुझको कब तक रोकोगे…#साहेब @SharadPawar_NCP ❤️⏰@SupriyaOffice @MPSupriya_Sule pic.twitter.com/J4j5lP3IOK

— Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳 (@TeamSupriyaSule) July 8, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

1999 मध्ये शरद पवार यांनी भुजबळांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा पदांवर त्यांनी काम केले. तसेच अडीच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर देखील भुजबळांना मंत्रिपद दिले, तरीही भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे काटे फिरवले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करीत भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भुजबळांच्या बालेकिल्यात जाऊन भुजबळांना चितपट करण्याची नीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. येवला मतदार संघात भुजबळसलग चार टर्मपासून आमदार आहेत. आत्ता पवार त्यांना कसे चितपट करणार येणारा काळच ठरवेल.

 

शरद पवार यांनी आपल्या वयावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख केलात तर महागात पडेल. कामावर टीका करा. वय आणि वैयक्तिक हल्ला आम्हाला शिकवला नाही. यशवंतराव चव्हाण यांची ही शिकवण नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच काही लोक म्हणाले वय झाले. वय झाले खरे आहे. पण गडी काय आहे पाहिला कुठे. जास्त सांगायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकच्या येवला येथून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे विधान केले. आज मी टीका करायला आलो नाही. माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज चुकत नाही. इथे माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हाला त्रास झाला तर माफी मागतो, असे ते म्हणाले आहेत. चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

 

 

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी असे महायुतीचे सरकार स्थापन केले. यावर, ‘भाजप, शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. फक्त विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. कोणी काहीही बोलत असेल तरी आम्ही विकासासाठी आलो आहोत, असे उपमुख्यमंत्री अजि पवार यांनी सत्तेत सामिल होण्याचे स्पष्ट कारण सांगितले. ते गडचिरोलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावर चित्रपट येणार आहे. दिग्दर्शक निलेश नवलखा यांनी ट्विट करत याची माहिती दिली. शाळा, फॅण्ड्री यासारखे चित्रपटाचे निर्माते निलेश यांनी केले आहे. या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील षडयंत्र आणि कट – कारस्थानाची कथा सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाणक्य असे या चित्रपटाचे नाव आहे.

 

● गौतम अदानी यांनी घेतली पवारांची भेट

 

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शुक्रवारी रात्री उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी तब्बल 3 तास ही बैठक झाली. अदानी हे मोदी आणि पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आता बंडामध्ये अदानी भूमिका निभावणार का?, असा प्रश्न निर्माण होतो.

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #SharadPawar #got #wet #rainagain #age #mentioned #expensive #ChhaganBhujbal #Nashik #goutamadani, #शरदपवार #इतिहास #येवला #नाशिक #पावसात #भिजले #वयाचा #उल्लेख #छगनभुजबळ #महागात #अजितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘राष्ट्रवादीतील फूट हा पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम’, जुन्या सहका-याचा आरोप
Next Article झोन अधिकारी नाईकवाडी यांच्यासह चौघे निलंबित

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?