Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मर्सिडिज-बेंन्झ इंडियाची यशस्वी कामगिरी; 4775 कार्सची विक्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मर्सिडिज-बेंन्झ इंडियाची यशस्वी कामगिरी; 4775 कार्सची विक्री

admin
Last updated: 2025/04/11 at 12:57 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)। : भारतातील सर्वात जास्त पसंतीच्या लक्झरी कार उत्पादक मर्सिडिज-बेंन्झने आज 18,928 नवीन मर्सिडिज-बेंन्झच्या विक्रीसंख्येसह आर्थिक वर्षातील एकूण विक्रीप्रमाण जाहीर केले. कंपनीने जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीतही 4,775 नवीन मर्सिडिज-बेंन्झची विक्री केली. नवीन उत्पादन सादरीकरण, दर्जेदार नेटवर्क अपग्रेडेशन आणि उंचावलेला ग्राहक अनुभव हे मर्सिडिज-बेंन्झच्या चांगल्या विक्रीमागचे मुख्य कारण होते. मर्सिडिज-बेंन्झ इंडियाचे ‘Desire to Exceed’ बाजार धोरण ग्राहकांची निष्ठा वाढवण्यामध्ये आणि भारतीय बाजारात ब्रँडची लोकप्रियता अधिक दृढ करण्यात यशस्वी ठरले आहे. Core आणि Top-End Luxury विभागातील मजबूत कामगिरी ही मागील आर्थिक वर्ष आणि आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाही विक्रीतील मुख्य आकर्षण राहिले असून BEV मध्ये वेगाने झालेल्या वाढीने त्याला अधिक चालना मिळाली.

Top-End Luxury विभागासाठी जोरदार मागणी:

मर्सिडिज-बेंन्झ इंडियाच्या आर्थिक वर्ष 24-25 आणि आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत विक्रीतील मुख्य ठळक बाब म्हणजे S-Class, Mercedes-Maybach, EQS SUV आणि AMG रेंज यांचा समावेश असलेल्या Top-End Luxury विभागासाठीची मजबूत आणि सातत्यपूर्ण मागणी. आर्थिक वर्ष 24-25 मध्ये Top-End Luxury विभागातील विक्रीत 34% वाढ झाली असून S-Class, Mercedes-Maybach Night Series, G 580 with EQ Technology, EQS SUV आणि प्रतिष्ठेची AMG G 63 यासाठी जोरदार मागणी होती. आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये मर्सिडिज-बेंन्झ ने भारतात विकलेल्या विकल्या गेलेल्या 4 कार्स पैकी 1 हून अधिक कार या ‘Top-End Luxury’ वाहनांमधील होती. Top-End Luxury विभागातील प्रतीक्षा कालावधी 4 महिन्यांपासून सुरू होतो आणि प्रतिष्ठेच्या AMG G 63 साठी 1 वर्षापर्यंत वाढतो.

‘Core’ विभागासाठी सातत्यपूर्ण मागणी:

मर्सिडिज-बेंन्झ चा ‘Core’ विभाग आर्थिक वर्ष 24-25 आणि आर्थिक वर्ष 2025 ची पहिली तिमाही या कालावधीत विक्रीत सर्वात मोठा योगदान देणारा ठरला. C-Class, E-Class LWB सेदान्स, GLC आणि GLE SUVs यांचा समावेश असलेल्या Core विभागाने ग्राहकांची इच्छा आणि निष्ठा कायम ठेवली आणि मर्सिडिज-बेंन्झच्या एकूण विक्रीमध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलला.

आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये E-Class LWB (आता डायनॅमिक E 450 प्रकारासह उपलब्ध) यशस्वी ठरली आणि सर्व बाजारपेठांमध्ये खूप चांगला ग्राहक प्रतिसाद मिळाला. Long Wheelbase E-Class ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी लक्झरी कार राहिली आहे.

Entry Luxury विभाग:

मर्सिडिज-बेंन्झ चा ‘Entry Luxury’ विभाग लक्झरी ग्राहकांसाठी जास्त मूल्य असलेली उत्पादने देतो. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये, मर्सिडिज-बेंन्झ च्या Entry Luxury विभागात 28% घट झाली. हा मुख्यतः कमी किमतीच्या आणि जास्त ऑफर असलेल्या उत्पादनांनी व्यापलेला विभाग आहे. मर्सिडिज-बेंन्झची उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण आणि पूर्णपणे लोडेड असून, वाढत्या ग्राहक अपेक्षांसाठी मूल्य-आधारित विक्री दृष्टिकोन दिसून येतो.

BEV साठी मजबूत मागणी:

मर्सिडिज-बेंन्झ च्या BEV पोर्टफोलिओमध्ये आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 51% मजबूत वाढ झाली असून एकूण विक्रीपैकी 7% इतके BEV प्रमाण आहे. BEV विक्री वाढीमुळे संपूर्ण पोर्टफोलिओसाठी मिळालेला सातत्यपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. त्यामध्ये EQS SUV साठी सर्वाधिक ग्राहक डिलिव्हरीचा उल्लेखनीय टप्पा गाठला गेला.

आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या तिमाही मध्ये विक्रीमध्येही BEV पोर्टफोलिओसाठी असाच जोरदार प्रतिसाद मिळाला, ‘Made in India’ EQS SUV 580 आणि EQS SUV 450 साठी विशेषतः चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या तिमाही मध्ये BEV प्रमाण 8% पर्यंत गेले. BEV विभागात विशेषतः Top-End Luxury क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, EQS Maybach Night Series आणि शानदार G 580 SUV with EQ Technology साठी उच्च मागणी दिसून आली. या दोन्ही वाहनांसाठी प्रतीक्षा कालावधी 12 महिन्यांपर्यंत आहे.

आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिटेल नेटवर्क विस्ताराची योजना:

मर्सिडिज-बेंन्झ इंडिया च्या ‘Go to Customer’ धोरणाचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिटेल नेटवर्क विस्ताराची योजना आहे. बाजारपेठीय विस्ताराच्या अंतर्गत, मर्सिडिज-बेंन्झ आपले रिटेल नेटवर्क नवीन उदयोन्मुख बाजारांमध्ये तसेच नवी दिल्ली NCR, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या विद्यमान महानगरांमध्ये 21 जागतिक दर्जाच्या MAR20X आउटलेट्सद्वारे वाढवणार आहे. यासाठी पुढील तीन वर्षांत फ्रँचाईज पार्टनर्सकडून 450 कोटी रु. ची गुंतवणूक होणार आहे. मर्सिडिज-बेंन्झ कानपूर, जम्मू, वाराणसी, उदयपूर आणि पाटणा या प्रमुख उदयोन्मुख बाजारांमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या आठवड्यात आग्रा येथे एका अत्याधुनिक आधुनिक लक्झरी सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

(मर्सिडिज-बेंन्झ इंडियाचे वरील सर्व विक्री आकडे हे रिटेल विक्रीचे आहेत)

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वन्‍यप्राण्यांनाही तीव्र पाणी टंचाईच्या झळा, पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा
Next Article जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार – बावनकुळे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?