Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आठवडाभरात पारा ४०अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आठवडाभरात पारा ४०अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका

admin
Last updated: 2025/03/29 at 12:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 29 मार्च (हिं.स.) गेल्या आठ दिवसांपासून तापमान ३९अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम फळबागा व भाजीपाल्यावर होत आहे. उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला व लिंबू महाग होणार आहेत. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे आजारपणात वाढ झाली होती. सध्या व्हायरल कमी झाले असले तरी पिकांवर संकट येऊ घातले आहे. गहू काढण्यात आला असला तरी कांदा अजून बाकी आहे. फळबागा व भाजीपाला सध्या लागवड केलेले आहेत. यात प्रामुख्याने वांग्याचा समावेश आहे. लग्न सराईचे दिवस येत असल्याने वांग्याची मागणी अधिक असते. मात्र या वांग्यावर उष्णतेचा परिणाम होत असून चवही लागत नाही. ऊन्हाचा भाज्यांना फटका बसत आहे.

उन्हाळ्यातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्रता पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रीतीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा. सध्याच्या वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करताना ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे. मनीषकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भुजल पातळीत घट तापमान वाढत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे पिकांना, भाजीपाला पिकांना, फळबागांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मालमत्ता कर वसूलीसाठी मनपा मध्‍य झोन क्र.२ ची धडक जप्‍ती मोहिम
Next Article बारामतीतील मुलींना कर्करोगावरील लस मोफत देणार – अजित पवार पुणे, 29 मार्च (हिं.स.) : सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग चिंताजनक असून त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व मुलींना अदर पूनावाला यांनी विकसीत केलेली लस विनामूल्य दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. डॉ. विशाल व डॉ. निकीता मेहता यांच्या रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, ज़ॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटरचे उदघाटन अजित पवार यांनी केले. त्या प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. कर्करोगावर मात करण्यासाठी अदर पूनावाला यांनी एक लस विकसीत केली असून ती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना विनामूल्य देण्याचा कार्यक्रम सर्व जण मिळून हाती घेऊ. ही लस विनामूल्य देण्याची जबाबादारी मी घेतो असे अजित पवार म्हणाले. दरम्यान बारामतीतील नवीन साठवण तलाव ते कुस्तीगीर संघाचे कार्यालय या दरम्यान नीडावा कालव्याशेजारील जागेत एक कि.मी. लांबीची छोटी रेल्वे गाडी लहान मुलांसाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. तीन हत्ती चौकातील पूलाबाबत बोलतानाही त्यांनी हे काम केल्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केल्याचे नमूद केले. यातील तज्ज्ञांना विचारुन येथील रचना केली, पण ज्यांना यातील काही माहिती नाही, अशांनी येथे येऊन टीका केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बारामतीतील वाचनालय झाल्यानंतर जो वाचत नाही, तोही तिथे जाऊन वाचन करायला लागेल, अशी ही वास्तू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?