Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन ब्रिजला धडकले, अनेकजण जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन ब्रिजला धडकले, अनेकजण जखमी

admin
Last updated: 2025/05/18 at 3:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

न्यूयॉर्क, 18 मे (हिं.स.)।न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलीन ब्रिजला शनिवारी (दि.१७) मॅक्सिकोच्या नौदलाचे जहाज धडकले. या जहाजात २७७ प्रवासी होते.या अपघातात आतापर्यंत १९ जण जखमी झाल्याची माहिती समजतं आहे.हा अपघात कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात जहाज ब्रुकलिन ब्रीजला धडकतानाचा क्षण कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज पूर्व नदीवरून जात होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. यावेळी जहाजाचा वरील भाग ब्रीजला धडकला. या अपघातात अनेकजण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच न्यूयॉर्क फायर डिपार्टमेंटचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. व्हायरल व्हिडिओत जहाजाच्या वरील बाजूस मॅक्सिकोचा हिरवा, सफेद, लाल रंगाचा झेंडा फडकताना दिसतो. जो ब्रुकलिन ब्रीजच्या खालून जात असताना धडकताना दिसतो. त्यानंतर हे जहाज नदीच्या किनारी येताना दिसते.

मॅक्सिकन नौदलानेही सोशल मीडियावर पोस्ट करत हे प्रशिक्षण जहाज कुआउटेमोक ब्रुकलिन ब्रीजला धडकल्यामुळे अपघातग्रस्त झाले. त्यामुळे त्याचा प्रवास थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे. नौदल आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. कुआउटेमोक हे प्रशिक्षण जहाज आहे. जे मॅक्सिकन नौदल स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर समुद्री प्रवास करायला नेते. यावर्षी हे जहाज ६ एप्रिल रोजी मॅक्सिकोच्या प्रशांत तटावरील अकापुल्को बंदरावरून २७७ जणांना घेऊन रवाना झाले होते.

मॅक्सिकन नौदलाचे हे जहाज १५ देशातील २२ बंदरावर थांबणार होते. ज्यात किंग्सटन(जमैका), हवाना(क्यूबा), कोजुमेल(मॅक्सिको) आणि न्यूयॉर्कचा समावेश होता. त्याशिवाय ते रेक्याविक(आईसलँड) बोर्डो, सेंट मालो आणि डनकर्क(फ्रान्स),एबरडीन(स्कॉटलँड)सारख्या स्थानकांवर जाणार होते. एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात ते १७० दिवस समुद्रात आणि ८४ दिवस बंदरावर घालवणार होते. या जहाजाच्या अपघाताची मॅक्सिकन अधिकारी चौकशी करणार आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next Article बीसीसीआयच्या बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?