Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुंभारी एमआयडीसीचे भूसंपादन लवकरच; सोलापुरात एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कुंभारी एमआयडीसीचे भूसंपादन लवकरच; सोलापुरात एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाची घोषणा

Surajya Digital
Last updated: 2023/02/12 at 7:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

 

Contents
● उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहितीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)> मंद्रुपच्या जागा शेतकऱ्यांना परत करणार> उद्योग मंत्र्यांच्या घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून रस्ते विकासाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. निर्माण झालेल्या हायवेमुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात चांगले उद्योग येण्यासाठी कुंभारी, अक्कलकोट, पंढरपूर, मोडनिंब चिंचोळी नव्याने एमआयडीसी निर्माण केल्या जाणार आहेत. कुंभारी औद्योगिक क्षेत्राची हायपॉवर कमिटी तयार झाली आहे. Kumbhari MIDC land acquisition soon; MIDC regional office announced in Solapur by Solapur Industries Minister Uday Samant

 

लवकरच ९४६ हेक्टर जागेचे भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली जाणार आहे. मंद्रुपच्या शेतकऱ्यांचा एमआयडीसीला विरोध असेल तर शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांच्या जमीन लवकरच परत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

उद्योग विभागाचा आढावा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना सामंत म्हणाले, जिल्ह्यातील सुरत चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडोर, नागपूर गोवा हायवे, हैदराबाद सुरत, पुणे- मुंबई हे हायवे सोलापुरातून जात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एमआयडीसीमधील जागा कमी पडतील. त्यामुळे काही नव्याने तर काही एमआयडीचा विस्तार केला जाणार आहे. कुंभारी एमआयडीसीचे ९४६ हेक्टर वर आहे. हाय पॉवर कमिटी गठित झाली आहे. दर फायनल झाला आहे. लवकरच भूसंपादनाची कार्यवाही चालू केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

 

अक्कलकोटमध्ये १०० तर पंढरपुरात १५१ हेक्टरवर एमआयडीसी होणार आहे. जागा निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीला भू-निवड समिती अक्कलकोट आणि पंढरपुरात येणार असल्याचे सांगितले. सोलापूर चिंचोळी औद्योगिक वसाहतीमध्ये जागा शिल्लक नसल्याने या एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी १५१ हेक्टर जागा भू-संपादन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोडनिंब येथे देखील ३२२ हेक्टर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सोलापुरात एमआयडीसीचे कार्यालय चालू करून एक खिडकी योजने अंतर्गत सर्व सुविधा दिल्या जातील.

यासाठी लागणाऱ्या इमारतीसाठी ४ कोटी ५१ लाखांच्या निधीची घोषणा केली. आठ दिवसात त्याचा आदेश काढला जाणार असल्याचे सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

> मंद्रुपच्या जागा शेतकऱ्यांना परत करणार

 

दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जागेला विरोध आहे. एकरी ६५ लाखांची मागणी केली आहे. मात्र, हायपॉवर कमिटीने २५ लाख दर फायनल केला आहे. त्यामुळे ज्यांना जमीन द्यायची नाही त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. लवकरच भूसंपादन केलेल्या जमिनीबाबत डी नोटीफिकेशन ऑडर काढण्याची घोषणा उद्योग मंत्र्यांनी यावेळी केली.

> उद्योग मंत्र्यांच्या घोषणा

* चिंचोळी एमआयडीसी रस्ते विकासाठी ४ कोटी ३० लाख

* टेंभुर्णी एमआयडीसी रस्ते विकास ३ कोटी ७० लाख

* बार्शी एमआयडीसीची पाणी पुरवठ्यासाठी ४ कोटी

* अक्कलकोट रोड एमआयडीसी रस्ते विकासासाठी २० कोटी

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Kumbhari #MIDC #land #acquisition #soon #MIDC #regionaloffice #announced #Solapur #Solapur #IndustriesMinister #UdaySamant, #कुंभारी #एमआयडीसी #भूसंपादन #लवकरच #सोलापूर #एमआयडीसी #प्रादेशिक #कार्यालय #घोषणा #उद्योगमंत्री #उदयसामंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभयारण्याला माळढोकचे पुनर्वेभव लाभणार; पन्नास एकर जागेवर प्रजनन केंद्र उभारणार
Next Article साखर पट्ट्यात लागली स्ट्रॉबेरीची गोडी; 45 डिग्री तापमानात बहरली लालचुटुक स्ट्रॉबेरी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?