Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावतीत ३.८ रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का, मेळघाट केंद्रबिंदू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमरावतीत ३.८ रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का, मेळघाट केंद्रबिंदू

admin
Last updated: 2025/06/05 at 5:48 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 5 जून (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यासह अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या उत्तर भागात बुधवारी रात्री ९:५७ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर यांची नोंद ३.८ इतकी करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदूच्या शिवझिरी अमरावती जिल्ह्यातील धारणी नजीकच्या आणि मध्य प्रदेशातील मेळघाट पर्वतरांगेत जमिनीपासून १० किलोमीटर खाली होता, असे एनसीएसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाने देखिल या घटनेला दुजोरा दिला असून कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे म्हटले आहे.

धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी रात्री ९.५७ वाजता ३.८ रिक्टर स्केलचा सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्रांत झालेली आहे. प्रत्यक्षात या गावांमधील नागरिकांना कुठल्याही स्वरुपाचे धक्के जाणवले नसल्याची माहिती धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी दिलीधारणी तालुक्यातील शिवझिरी हे भूकंपाचे केंद्र असल्याचे ‘एनसीएस’च्या रिपोर्टमध्ये नमूद आहे व या लगतच्या सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली. त्यांनी याबाबत धारणी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली व या गावांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांची चमू पाठविण्यात आली. शिवाय तहसीलदार शेवाळे यांनी या गावांमधील काही नागरिकांशी संपर्क केला असता, कुठल्याही स्वरुपाचा धक्का जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्र कित्येक वर्षांपासून बंद आहे. या यंत्राची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशकात भरधाव कार शिरली बंगल्यात; पाच जणांचा मृत्यू
Next Article भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही, राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?