प्रतिनिधी
सोलापूर : कायद्याचे रक्षण करण्याबरोबरच, समाजातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणार्या पोलिसांच्या विरोधात औरंगजेबचे समर्थक जर असतील तर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त पोलिसांसोबत असतील असे ठणकावून सांगत शुक्रवार (ता.21)सोलापुरातील हुतात्मा चौकात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळच्यावतीने पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
दरम्यान महाराष्ट्र पोलीस जनतेच्या सेवेसाठी,रक्षणासाठी अहोरात्र काम करत असताना जर पोलिसांवरच औरंगजेगब प्रेमी हल्ले करत असतील तर महाराष्ट्रात तमाम शिवभक्तांना या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे यावेळी सुचित करण्यात आले.
नागपूरच्या घटनेत औरंगजेब समर्थकांनी तील पोलीस उपायुक्त यांच्यावर हल्ला केले. 40 पोलीस कर्मचारी जखमी केले आणि महिला पोलिसांचा विनयभंग केला. या घटनेचा तीव्र निषेध यावेळी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.
नागपूर प्रकरणातील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांची धिंड काढून त्यांच्यावर मकोका लावावा, दंगल घडवून आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याबद्दल दोषींनी प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात मावळे जनतेच्या रक्षणासाठी लढत होते, त्याप्रमाणे सध्या स्थितीत शिवभक्त आहेत, असे मनोगत मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी व्यक्त केले
यावेळी निशांत साळवे, राजाभाऊ घेजगे, राहुल दहिहंडे, लोकेश इराकशेटी,गणेश माळी,अजिंक्य शिंदे,सौदागर क्षीरसागर,पवन आलुरे,नागेश भोसले,सागर गायकवाड,सुमंत जगदाळे आदी जण उपस्थित होते.
———————
फोटो ओळ : सोलापूर : पोलिसांच्या समर्थनार्थ, पोलिसांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक घालताना मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी.