उत्तर सोलापूर : उत्तर तालुक्यातील भोगाव येथील टोल नाक्यावर भाजपा उत्तर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
शेतीवर आधारीत पशु पालन व्यवसाय आहे. सध्या शेतकरी विविध अडचणीमध्ये सापडला आहे. पशु पालनातून व दुध विक्री व्यवसायातून आर्थिक अडचणी सोडवत असताना दुधाला प्रति लिटर भाव कमी केल्याने आर्थिक अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे सरकारने पशु पालकांना दूधदर वाढ मिळावी व इतर योजनांचा फायदाही शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीमंत बंडगर, भारत जाधव, उपाध्यक्ष संदिप सुरवसे, संग्राम पाटील, मार्डीचे उपसरपंच युवराज पवार, सुहास भोसले, विनायक सुतार, उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.