Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्री दादा भुसेंनी दोन रुपयांचा चेक घेऊन शेतकऱ्याला बोलावले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

मंत्री दादा भुसेंनी दोन रुपयांचा चेक घेऊन शेतकऱ्याला बोलावले

Surajya Digital
Last updated: 2023/02/28 at 7:02 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यास सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याची पट्टी व दोन रुपयांचा चेक यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सोलापूर मार्केट यार्डातील सूर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याबाबत संताप व्यक्त केला. Minister Dada Bhuse called the farmer with a check of Rs

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》५१२ किलो कांदा विकून हातात पडला फक्त २ रूपयाचा चेक, बळीराजाच्या ‘डोळ्यात पाणी’

 

शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी राज्य सरकारमधील दादा भुसे यांना कॉल करून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी माहिती दिली. ‘मला दोन रुपयांचा चेक वटवण्यासाठी जवळपास ३०० रुपये खर्च येत आहे. याबद्दल मंत्री दादा भुसे यांना फोन केला होता. मग त्यांनी पुन्हा फोन केला. दादा भुसेंनी मालेगावला या असे उत्तर दिले. दोन रुपयांसाठी कुठे कुठे जाऊ, किती खर्च करू?’, असा सवाल शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ५८ वर्ष, रा. झाडी बोरगाव, बार्शी, सोलापूर) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात १७ फेब्रुवारी २०२३ ला जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर पसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. मार्केट यातील सूर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक शेतकऱ्याच्या दिला होता. चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 

● ‘दोन रुपयांसाठी दादा भुसेंनी मालेगावला या म्हटले’

या प्रकरणी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी माहिती दिली. ‘दोन रुपयांचा चेक वटवण्यासाठी ८ मार्चला जायला जवळपास ३०० रुपये खर्च होत आहे. याबाबत शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसेंना कॉल केला होता. त्यांनी फोनवरून सर्व माहिती ऐकून घेतली. आणि पुन्हा फोन करून मालेगावला या असं उत्तर दिलं आहे. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्रीही थट्टा करत आहेत’, अशी खंत यावेळी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》५१२ किलो कांदा विकून हातात पडला फक्त २ रूपयाचा चेक, बळीराजाच्या ‘डोळ्यात पाणी’

सोलापूर – सत्ता कोणत्याही पक्षाची असो शेतक-यांच्या पदरी कायमच निराशा पडते. खर्च जास्त अन् उत्पन्न कमी असेच शेतीचे गणित बनत चालले असून शेतकऱ्यांना शेती पिकविणे म्हणजे झुगार खेळल्या सारखे झाले आहे. अर्थसंकल्प असो अथवा निवडणुका फक्त शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्यांनी घोषणांचा पाऊस पडतो अन् पुढे काहीच होत नाही.

सध्या कांद्याला मिळणारा भाव कमी झाला आहे, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. असाच एक हताश झालेल्या शेतकऱ्यांची कांदा पट्टी व दोन रूपयाचा चेक सध्या सोशल मिडियावर खुप व्हायरल झाला आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ५८ वर्ष,रा, झाडी बोरगाव, बार्शी ) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दहा पोत्यातून पाचशे बारा किलो कांदा विकला होता.कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते.

मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला होता. चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यास दिलेली पट्टी आणि चेक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडली जातात आणि डोळ्यासमोर पीक करपून जातं. याकडे सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष नसते. या घसरलेल्या दरामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून सरकारने तात्काळ लक्ष घालून योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

 

○ काबाडकष्टाचे मोल कवडीमोल

बोरगाव येथून १० पोती कांदा विक्रीसाठी १७ फेब्रुवारी रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले होता.यामध्ये ८ पोत्यांचे वजन ४०२ किलो भरले तर २ पोत्यांचे वजन ११० किलो भरले होते.कांद्याला दर प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणं प्रमाणे भाव मिळाला. (म्हणजे १ रूपया किलो )लिलाव झाला अन् पट्टी तयार करण्यासाठी आडत व्यापार्याने पावती पुस्तक काढले. एकूण बील ५१२ रुपये झाले.

 

हमाली,तोलाई,मोटारभाडे असे एकूण ५०९ रुपये खर्च झाले होते.५१२ रुपयांमधून ५०९ रुपये वजा केले असता,शिल्लक २ रुपये ४८ पैसे राहिले. बाजार समितीमधील नासिर खलिफा(सूर्या ट्रेडर्स) या व्यापाऱ्याने सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे दोन रूपयांचा चेकवर ८ मार्च २०२३रोजीची तारीख देण्यात आली आहे.दोन रुपयांसाठी पुन्हा सोलापुरातील मार्केट यार्डात जावे लागणार आहे.असेच कवडीमोल दर मिळाल्यास जगणे अवघड होणार आहे आणि शेती न पिकविल्यास पोटाला खाणार काय ? असा प्रश्न पडला असल्याचे राजेंद्र तुकाराम चव्हाण (कांदा उत्पादक शेतकरी,बोरगाव ता.बार्शी) कैफियत मांडली.

 

○ कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले

 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक वाढली आहे.यामध्ये उत्तम दर्जाच्या कांद्याला आज देखील १ हजार रुपये ते १४०० रुपये भाव मिळतआहे.बारीक,चिंगळी,फकडी
या प्रकारच्या मालाला कमी दर प्राप्त होतो.राजेंद्र चव्हाण (झाडी बोरगाव,ता बार्शी) येथून आलेल्या शेतकऱ्याचा बारीक व चिंगळी प्रकारचा माल आणला होता,कांद्याच्या दर्जानुसार त्याला भाव मिळाला आहे.नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्यास चेकने मोबदला दिला जातो.१७ फेब्रुवारी रोजी देखील २ रुपयांचा चेक देण्यात आला.कांद्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढली तर खराब मालाला देखील भाव मिळतो, असे नासिर खलिफा (सुर्या ट्रेडर्स, सोलापूर) यांनी सांगितले.

 

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Minister #DadaBhuse #called #barshi #farmer #check #malegaon, #कृषीमंत्री #दादाभुसे #२रुपया #चेक #शेतकरी #बोलावले #मालेगाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर काँग्रेस भवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Next Article लक्ष्मी विष्णू मिल मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव भरणार

Latest News

पंतप्रधान मोदींनी देशासाठी समर्पित केलेली ११ वर्ष कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी;  दरेकरांचे आवाहन
महाराष्ट्र June 24, 2025
मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र June 24, 2025
माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
महाराष्ट्र June 24, 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 24, 2025
crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?