Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; तरुणाला 1 वर्षे सक्‍तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; तरुणाला 1 वर्षे सक्‍तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2023/02/03 at 2:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 अपहरण करून मारहाण; राज्य राखीव तिघा पोलिसांची निर्दोष मुक्तता

सोलापूर – अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या तरुणास विशेष न्यायाधीश व्हि.पी. आव्हाड यांनी १ वर्षाची सक्‍तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भिमाशंकर रेवणसिध्द बिराजदार (वय २९ रा.जुळे सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. Sexual harassment of a minor girl; Youth 1 year hard labor Solapur Court

 

याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिडीता ही घरी एकटी असताना आरोपी भिमाशंकर बिराजदार याने डिसेंबर २०१८ मध्ये तिच्या घरात घुसून माझ्यावर तू प्रेम कर नाही तर मी तुला कॉलेजला ये-जा करताना पळवून नेतो. अशी धमकी दिली होती. त्यानंतर बिराजदार याने पिडीतेचा सतत पाठलाग करून आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणाला.

 

त्यावेळी पिडीतेने पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पिडीतेची बदनामी करून तिला लैंगिक अत्याचार केला. म्हणून विजापूर नाका पोलिसात पोक्सो अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपास विजापूर नाका पोलिसांनी करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते.

 

या खटल्यात सरकारच्यावतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी, पुरावा व सरकारी वकिलांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बिराजदार यास शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शीतल डोके तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड म्हेत्रे यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 अपहरण करून मारहाण; राज्य राखीव तिघा पोलिसांची निर्दोष मुक्तता

 

सोलापूर – किरकोळ कारणावरून एका तरुणास मोटारीतून पळवून नेऊन मारहाण केल्याच्या आरोपातून राज्य राखीव दलातील रमिझ सिकंदर शेख, इजाज मुबारक शेख आणि रशीद बाशूलाल पठाण ( सर्व रा.एस.आर.पी कॅम्प, सोलापूर) या तिघांना गुन्हा शाबित न झाल्यामुळे निर्दोष मुक्त करण्याचा आदेश न्याय दंडाधिकारी प्रशांत वराडे यांनी नुकताच दिला.

 

७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास तिघां आरोपींनी फिर्यादी एस.एन कानकुर्ती यास किरकोळ कारणांवरून पुंजाळ मैदान (भद्रावती पेठ) येथे मारहाण केली. आणि त्यांच्या चारचाकी वाहनामध्ये जबरदस्ती बसवून डफरीन चौक येथे एका दवाखान्याजवळ नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यास सात रस्ता येथे घेऊन येऊन पुन्हा काठीने मारहाण केली.

सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय पॉलीटेक्निक कॉलेज जवळ गाडीतून ढकलून दिले. अशा आशयाची फिर्याद जेलरोड पोलिसात दाखल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी क्र.१ व २ यांना अटक केली होती. मा. कोर्टाने आरोपींचा जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी तीनही आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

आरोपीच्या वतीने ॲड.प्रशांत नवगिरे यांनी साक्षीदारांचे साक्षीत विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन युक्तिवाद मांडला होता. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सागर मंद्रूपकर यांनी काम पाहिले.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Sexual #harassment #minorgirl #Youth #hardlabor #SolapurCourt, #सोलापूर #अल्पवयीन #मुली #लैंगिक #छळ #तरुण #सक्‍तमजुरी #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या
Next Article कोल्हापूर – बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?