Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना बाधित रुग्णाची सरकारी रुग्णालयात आत्महत्या; वडिलांच्या हत्येबद्दल संशय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

कोरोना बाधित रुग्णाची सरकारी रुग्णालयात आत्महत्या; वडिलांच्या हत्येबद्दल संशय

Surajya Digital
Last updated: 2020/09/28 at 8:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : मिरजेतील सरकारी कोविड रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बाबूमिया मोमिन याना कोरोना झाल्यामुळे त्यांना १० दिवसांपूर्वी उपचारासाठी मिरज येथील सरकारी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सोमवारी पहाटे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोमिन यांच्या बेडवर रक्त आढळून आले. जवळ जाऊन बघितले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या घटनेची माहिती मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याला फोनद्वारे देण्यात आली तसेच पोलिसांना देखील कळवण्यात आले.
या घटनेची खबर मिळताच मिरज पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली असता हुसेन मोमिन यांच्या गळ्यावर जखमा असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या बाजूला चाकू देखील पडला होता. मोमीन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान हुसेन मोमिन यांचा मुलगा मुस्तफा यांच्याकडून वडिलांच्या हत्येबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्यासारखी माझ्या वडिलांची मानसिक स्थिती नव्हती. रुग्णालयातील कोरोना वार्डमधील सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे, तसेच पोलिसांनी या घटनेची योग्य चौकशी करावी त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये अशी भूमिका मोमिन यांचा मुलगा मुस्तफा मोमिन यांच्याकडून घेण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाने सरकारी कोविड रुग्णालयात आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशातच सांगली येथील सरकारी कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सोमवारी पहाटे हा प्रकार घडला. हुसेन बाबूमिया मोमिन असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना कोरोना झाला होता व त्यांच्यावर सांगली येथील सरकारी कोविड रुग्णालयात उपचार चालू होते.

आज पहाटे त्यांनी स्वतःचा गळा कापून आपल्या जीवनाचा शेवट केला. या आत्महत्येबाबत मृताच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका नातेवाईकांकडून घेण्यात आली आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #मिरज #सरकारी #रुग्णालय #कोरोना #रुग्ण #आत्महत्या #संशय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन
Next Article केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?