Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महामार्ग पोलिसांचा भोंगळ कारभार; गाडी मोहोळमध्ये अन् दंड मोडनिंबमध्ये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महामार्ग पोलिसांचा भोंगळ कारभार; गाडी मोहोळमध्ये अन् दंड मोडनिंबमध्ये

Surajya Digital
Last updated: 2021/07/30 at 10:06 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर दिवस – रात्र वाहनधारकांवर कारवाया करून महामार्ग पोलिसांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. सावळेश्वर आणि वरवडे टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून चार चाकी वाहने अडवली जातात.  २९ जुलै रोजी मोहोळ येथील एका वकिलाच्या बाबतीत असा प्रकार घडल्यामुळे महामार्ग पोलिसांचा भोंगळ  कारभार चव्हाट्यावर  आला आहे

मोहोळ येथील विधिज्ञ ॲड. कैलास नाईक यांच्याकडे चारचाकी आहे. त्यांची चारचाकी सध्या घरीच लावून आहे. मात्र २९ जुलै रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर सदर चारचाकीला दोनशे रुपये दंड केल्याबाबत चा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी त्यांची चार चाकी घरीच आहे का नाही याची खात्री केली असता सदर चार चाकी घरासमोरच होती. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून असा दंड करण्याचा हेतू त्यांच्या लक्षात येईना. त्यामुळे त्यांनी त्यांचे लहान भाऊ पत्रकार भारत नाईक यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली असता, सोलापूर पुणे महामार्गावरील मोडनिंब येथे ही कारवाई करण्यात आल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यामुळे नाईक यांनी आमची गाडी घरीच आहे मग कारवाई कशी केली अशी विचारणा केली असता महामार्ग पोलिसांकडून कारवाईचे समर्थन करण्यात आले.

यासंदर्भात भारत नाईक यांनी ऑनलाइन कारवाई संदर्भात महामार्ग पोलिसांनी अपलोड केलेला फोटो पाहिला असता त्यांना धक्काच बसला. कारण महामार्ग पोलिसांकडून एम.एच.१३, बी.एन. ९०६५ या चार चाकी वाहनावर कारवाई करण्यात आली होती. तर नाईक यांच्या कारचा नंबर एम.एच.१३, बी.एन. ६०६५  असा आहे. त्यामुळे आशा किती चुकीच्या वाहनांवरती महामार्ग पोलिसांकडून कारवाया होत आहेत. काय चाललंय? वरिष्ठ पोलिस अधिकारी अशा चुकीचा कारवाया करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कधी लक्ष देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

* डेकोरेशन बिझनेससाठी विवाहितेला पाच लाखाची मागणी ; पतीसह चौघांवर गुन्हा
सांऊड सिस्टिम व डेकोरेशनच्या बिझनेससाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ३० जुलै २०२० ते आजतागायत घडली. याप्रकरणी स्वाती प्रवीण अलझेंडे (वय-२५,रा.न्यू जगजीवनराम नगर, मोदी सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती किशोर अलझेंडे, लक्ष्मी किशोर अलझेंडे, किशोर नागप्‍पा अलझेंडे, शुभांगी किशोर अलझेंडे (सर्व रा.विठ्ठल मंदिर,क्रिश अपार्टमेंट, अंबरनाथ, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी स्वाती यांचा विवाह  ३० जुलै २०२० रोजी प्रवीण अलझेंडे यांच्यासोबत झाला होता.  लग्नानंतर पहिल्या दिवसापासून वरील आरोपींनी मिळून माहेरून सोने आणि पैसे बिझनेससाठी आणि म्हणून त्रास देऊन फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर सासरकडील मंडळींनी फिर्यादी स्वाती यांना साऊंड सिस्टिम व डेकोरेशनच्या बिझनेससाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून मागणी केली होती. जर माहेरहून पैसे आणले नाही तर तुझा जीव मारेल अशी धमकी देऊन, फिर्यादीला प्रवीण याने नेहमी किरकोळ कारणावरून भांडण काढून हाताने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली. याचा पुढील तपास पोलीस  करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Mismanagement #highway #police #car #Mohol, #महामार्ग #पोलिसांचा #भोंगळ #कारभार #मोहोळमध्ये #दंड #मोडनिंबमध्ये
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Next Article कोल्हापूरच्या शाहुवाडी चौकात आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर, काय झाले वाचा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?