Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेच्या गावांना निधी देत नसल्याने आमदार मानेंचा शिवसैनिकांनी केला निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शिवसेनेच्या गावांना निधी देत नसल्याने आमदार मानेंचा शिवसैनिकांनी केला निषेध

Surajya Digital
Last updated: 2021/10/26 at 5:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही महाविकास आघाडीमध्ये मोहोळ तालुक्यातील आमदार यशवंत माने हे शिवसैनिकांची कामे करत नाहीत, शिवसेनेच्या गावांना निधी दिला जात नाही, त्यामुळे आमदार यशवंत माने यांचा मोहोळ शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

मोहोळ येथील रेस्ट हाउसवर जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या एका गटाची बैठक पार पडली. यावेळी रामहिंगणेचे बाळासाहेब वाघमोडे भांबेवाडीचे  केशव वाघचौरे कोळगावचे नामदेव केवळे   पोखरापूरचे आशिष आगलावे मुंडेवाडीचे राहुल व्यवहारे मोहोळ शहर प्रमुख विक्रम विक्रम देशमुखउपशहर प्रमुख जहीर खैरादी पेनुरचे संदीप चवरे  हिगणीचे गणेश झेंडगे चिंचोली काटीचे कयुम शेख  कोरवलीचे सिद्धाराम म्हमाणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी तालुका नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील शिवसेनेचे नेते मंडळीही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील शिवसैनिकांच्या विरोधी पार्टीच्या गटाला सपोर्ट करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात प्रामाणिकपणे लढणाऱ्या शिवसैनिकांचे खच्चीकरण होते, तरीही मोहोळ तालुक्यातला शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे तो न डगमगता पक्षांमध्ये ठामपणे उभा राहिलेला दिसून येत आहे, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे यांनी व्यक्त केले.

तालुकाप्रमुख मोहोळ तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांना बैठकीचे निमंत्रण देत नाहीत. आम्ही मागील २५ वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहोत तरी आम्हाला निष्ठावान म्हणून समजले जात नाही. अनेक नेते मंडळी राष्ट्रवादीतून परत माघारी आली आणि परत शिवसेनेचे काम करू लागली, परंतु आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेमध्ये असलो तरी आम्हाला निष्ठावान समजले जात नाही, अशी खंत कोळेगावचे माजी सरपंच  नामदेव केवळे यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार म्हणाले की, आगामी सर्व निवडणुकीत निष्ठावंताना विश्वासात घेतले पाहिजे आणि निवडणुका लढताना ‘धनुष्यबाण’  या चिन्हावरच लढाव्यात ही आमची प्रमुख मागणी, आहे असे ते म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* ऊस तोडीचे मजूर पुरविण्यासाठी पावणे सात लाख रुपये घेवून फसवणूक
बार्शी : ऊस तोडीचे मजूर पुरविण्याची खात्री देवून वारंवार पैसे घेवून मजूर न पुरविता पैसे माघारी न देवून पावणे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुकादम गणेश काळुराम राठोड (रा. म्हैसमाळ पो. बेलोरा ता. पूसद जि. यवतमाळ) व बाळकृष्ण प्रकाश पवार (रा. पिंपळगाव ता. मंगरुळपीर जि. वाशीम ) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत वाहतूक ठेकेदार सतिश गणपत हजारे (रा. पानगाव ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
सतीश हजारे यांनी जुन 2020 मध्ये बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि. (आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.युनिट-2) ईडा जवळा(नि) ता. भूम जि. उस्मानाबाद या कारखान्यासोबत आपल्या ट्रकमधून ऊस वाहतूकीचा करार केला होता. त्यामुळे ऊसतोड मजूर मिळण्यासाठी त्यांनी गावातील विजय निवृत्ती काळे व अभीजीत बिभीषण काळे यांचे ओळखीने ऊसतोड कामगारांचे मुकादम असलेल्या आरोपींशी संपर्क केला.

त्यांनी 1 टोळी (10 जोड्या) देतो असे सांगून प्रत्येक जोडीस 60,000/- रु. उचल व मुकादम यांना 75000/- रु कमिशन असा व्यवहार ठरविला. त्यानंतर त्यांना मागेल तसे वारंवार पैसे पुरविले. त्यांनी कामगार पुरविण्याची खात्री देवूनही शेवटी हात वर केले. मजुरही पुरविले नाहीत आणि पैसे ही परत दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #ShivSainiK #protested #MLA #Mane #funds #ShivSena #villages, #शिवसेना #गावांना #निधी #आमदार #माने #शिवसैनिक #निषेध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीबीआय चौकशी आणि ईडीवरून नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ
Next Article आरोग्य विभागाचा सोलापुरात मृत व्यक्तीला कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याचा प्रताप

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?