सांगली : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यात लाडू वाटून आनंद साजरा केला.
आमदार पडळकर यांनी स्वत: लोकांना लाडू वाटून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्यांनी हा नेत्रदीपक सोहळा ह्रदयात साठवून ठेवण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार पडळकरांनी अभिवादन केले. त्यानंतर करगणीतील राम मंदिरातील कार्यक्रमालाही त्यांनी भेट देऊन अभिवादन केले.
श्री प्रभू रामाच्या मंदिराची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा सर्वांनाच अभिमान आहे. हा आनंद द्विगुणित करत त्यांनी अनेकाना लाडू भरवून ऐतिहासिक क्षणाचा उत्साह वाढविला. आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख यांना लाडू भरवून भाजपसह समस्त देशवासियांच्या स्वप्नपूर्तीचे कौतुक केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, प्रभाकर पुजारी, विष्णुपंत अर्जुन, अनिल सुर्यवंशी, यु टी जाधव, चंदु कोळेकर, आशिक शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा केला.