Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती कायम !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती कायम !

Surajya Digital
Last updated: 2022/12/14 at 6:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● डॉ. सराफ होणार महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने आता 7 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यपालांना तोपर्यंत आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. Governor Bhagat Singh Koshyari MLAs cannot be appointed; Adjournment until February 7! Court

 

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गुंतागुंतीचा झाला आहे. ठाकरे सरकारची 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातील यादी भगतसिंह कोश्यारी यांनी नामंजूर केली होती. शिंदे सरकार आल्यानंतर नव्याने विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीची हालचाल सुरु झाली असताना हे प्रकरण कोर्टात पोहोचले.

सुप्रिम कोर्टात आज झालेल्या सुनावणीबाबत याचिकाकर्ते सुनील मोदी म्हणाले की, आज सुनावणीत मुळ याचिकाकर्त्यांनी विड्रॉचा अर्ज दिला होता. तर माझा इंटर्वेशन अर्ज असल्यामुळे युक्तीवाद झाला. युक्तावादात सरकारच्या वतीने तुषार मेहता आणि याचिकाकर्ते दवे तर आमच्याकडून नायडू युक्तीवादासाठी उभे राहिले. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारलं की, तुम्ही पीआएल केली आहे. मग विड्रॉ का करता, तसेच आता विड्रॉ करता येणार नाही. तर माझे इंट्रव्हेशन मान्य झालं असून ७ फेब्रुवारीपर्यंत आमदार नियुक्तीबाबत स्थगिती देण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी ७ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे ७ फेब्रुवारीपर्यंत आमदार नियुक्तीचा कोणताही निर्णय घेता येणार नाही. मागील दोन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडली आहे. आधीच्या सरकारने आमदारांची एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र यावर राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता. त्यातच सरकार बदललं आणि नव्याने आमदारांची यादी पाठविण्यात आली. यावरून आता कायदेशीर पेच तयार झाला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आमदारांची यादी सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडून परत मागवली होती. त्यावर इंटर्व्हेंशन याचिका दाखल करण्यात आली होती. ही घटनाबाह्य कृती आहे. राज्यपालांनी घटनेमध्ये राहून काम केलं पाहिजे. मात्र राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली. त्यामुळे आम्हाला स्थगिती मिळाल्याचे सुनील मोदी यांनी म्हटलं. दरम्यान कोर्टाने म्हटलं की, राज्यपालपद हे घटनात्मक पद आहे. राज्यपालांनी घटनात्मक पेच निर्माण होईल, अशी कृती करणे योग्य नाही, असंही न्यायालयाने नमूद केल्याचं मोदी यांनी सांगितलं.

 

● डॉ. सराफ होणार महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता

महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विद्यमान एजी आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सराफ हे महाधिवक्ता बनणार आहेत.

 

You Might Also Like

वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू

ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर

मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

TAGGED: #Governor #BhagatSinghKoshyari #MLAs #appointed #Adjournment #until #February #Court, #राज्यपाल #भगतसिंहकोश्यारी #अडचणीत #वाढ #झारखंड #कोर्ट #अवमाननोटीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या विमानसेवेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक धावले; खा. जयसिध्देश्वर महास्वामी गप्प राहिले
Next Article सोलापुरात बनावट नोटाप्रकरणी आणखी तिघांना अटक, इन्स्टिट्यूटमध्ये छापल्या नोटा, शोधत होते ग्राहक

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?