Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना नियम पालनावरुन पोलिस निरीक्षक व आमदारांमध्ये शाब्दिक चकमक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कोरोना नियम पालनावरुन पोलिस निरीक्षक व आमदारांमध्ये शाब्दिक चकमक

Surajya Digital
Last updated: 2021/09/15 at 10:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : गणेश उत्सवात आरतीसाठी परवानगी पेक्षा अधिक लोक जमविल्यावरुन आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याबाबत कोरोना नियमपालनाचा आग्रह धरल्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात रात्रीच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली.

पो.नि. शेळके हे आपल्या सहकार्‍यांसमवेत शहरात फिरत होते. तेव्हा त्यांना भोसले चौक येथील गणेश मंडळासमोर गर्दी दिसली. त्यामुळे गर्दीला पांगवण्याच्या सूचना देवून ते पुढे गेले. त्यानंतर तिथे फटाके फोडल्याचे आवाज आले. त्यामुळे पुढील चौकातून फिरुन ते माघारी आले. त्यावेळी तिथे वाढदिवस साजरा करणारे त्यांना पाहून पळून गेले.

त्यानंतर तिथे आलेल्या आमदार राऊत यांनी सर्व गणेश मंडळांनी खाजगी जागेतच उत्सव साजरा केला आहे. रस्त्यावर गर्दी नाही. आरतीला जास्त माणसे नाहीत. त्यामुळे कोरोना नियम पालनाबाबत अतिरेक करु नये. तसेच रस्त्यावर गेल्या 50-70 वर्षापासून फळ विक्रेते आपले गाडी लावतात. त्यांना प्रतिबंध करु नये. त्रास देवू नये. गुन्हा दाखल केल्याने काही फरक पडणार नाही, फटाके फक्त बार्शीतच उडत नाहीत, असे सांगण्यास सुरुवात केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावर शेळके यांनी गणेश मंडळांना चार पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. हा शासनाचा आदेश आहे. वाढदिवसासाठी 25 पेक्षा जास्त लोक होते. वाजंत्री होते. रस्त्यावर फटाके उडविले. हे योग्य नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नियमांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. व्यापार्‍यांनी नियमाने वागावे. रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी वाद घालू नये. सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असणार्‍यांबरोबर मुद्दा करु नये, असे सांगितले.

 

* पाठीमागे बसलेल्या इसमाने केला चाकूने वार,   दुचाकीवरील तरुण जखमी

सोलापूर – दुचाकीवरून ट्रीपलसीट जाताना पाठीमागे बसलेल्या इसमाने चाकूने वार केल्यामुळे तरुण जखमी झाला. ही घटना सात रस्ता परिसरातील मसीहा चौकाजवळ आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
श्रीशैल कुंडलीक केंगार (वय २० रा. निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याला खंडू शिवप्पा आयवळे आणि आदित्य रावतप्पा केंगार हे दोघे त्याला दुचाकीच्या मध्ये बसवून नेत होते. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या खंडू आयवळे याने आज तुला खलासच करतो असे म्हणत गळ्यावर चाकूने वार केला, अशी नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Verbal #clashes #police #inspectors #MLAs #corona #rule, #कोरोना #नियम #पालनावरुन #पोलिसनिरीक्षक #आमदार #शाब्दिक #चकमक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घराच्या वाटणीवरून काका पुतण्यात तलवार हल्ला, सराईत गुन्हेगारावर एमपीडीए
Next Article पुरुषोत्तम बरडेंची श्रीकांत देशमुखांना दमबाजी, राजकारणात चांगले प्रतिउत्तर देणार

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?