Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: …तरच मनसेशी युती करु, चंद्रकांत पाटलांची भूमिका तर मनसेचा दरेकरांना टोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

…तरच मनसेशी युती करु, चंद्रकांत पाटलांची भूमिका तर मनसेचा दरेकरांना टोला

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 3:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : यंदा मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.

* दरेकर आता फारच मोठा झालाय; मनसेचा टोला

प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. ‘त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला आहे,’ असा टोला नांदगावकर यांनी लगावला. दरेकर आधी मनसेत होते. मनसेकडूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मागाठाणे मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #तरचमनसेशी #युतीकरु #चंद्रकांतपाटलांची #भूमिका #मनसेचा #दरेकरांनाटोला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुमचे खाते आजच जनधनमध्ये ट्रान्सफर करा, अनेक फायदे
Next Article नगरसेवक काम करत नसल्यामुळे खूर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसविले

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?