Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी देशाचा कणा तो आज मोदी सरकारमुळे मोडून पडला, काँग्रेसचे निदर्शने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेतकरी देशाचा कणा तो आज मोदी सरकारमुळे मोडून पडला, काँग्रेसचे निदर्शने

Surajya Digital
Last updated: 2021/09/29 at 7:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी महागाई विरोधात निदर्शने केली.

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी व जीवनाश्यक वस्तूंची महागाई विरोधात आणि देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करणे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी सरकारविरोधात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ कमी करा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, MSP चा कायदा करा, महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दर व महागाई प्रचंड वाढली आहे.  या महागाईत सर्वसामान्य जनता होरपळत असून त्याचे चटके सहन करावे लागत आहे. याविरोधात अनेक वेळा आंदोलन केले. तरी जनतेचा आवाज ऐकून घेत नाहीत. याउलट देश अदानी अंबानी यांना विकत आहे, युवक बेरोजगार होत आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. शेतकरी संकटात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचे आवाज दाबला जातो, त्यांना गायब केले जाते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्तर प्रदेश मध्ये महंत गायब होत आहेत आत्ता पर्यंत पन्नास जण गडप झाले आहेत. जातीपातीच्या नावाखाली देशाचे वाटोळे करत आहेत. आमची संस्कृती गोरगरीब तळागाळातील जनतेचे, शेतकऱ्यांचे काम करणे त्यांच्या हितासाठी करत राहणार, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ची दरवाढ व महागाईमुळे लोक वैतागलेत त्यामुळे दरवाढ व महागाई ताबडतोब कमी करावी. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच असे ठणकावून सांगितले.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना अच्छे दिन चे महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली पण सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात आणि महागाई प्रचंड वाढविली. महिलांचा सन्मान करतो म्हणणाऱ्या मोदींनी गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांपर्यंत वाढविली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता भगिनी पुन्हा चुलीकडे वळत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असून तो आज मोदी सरकारमुळे मोडला आहे. त्याच प्रमाणे मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे केले ते रद्द झालेच पाहिजे. मन की बात करणारे मोदी सरकार जण की बात कधी करणार, म्हणून मोदी सरकारने महागाई लवकरात लवकर कमी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी करुन घोषणा दिल्या.

यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हा महिला अध्यक्ष, नगराध्यक्ष शाहीन शेख नगरसेवक तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका फिरदोस पटेल, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, मनिष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, अशोक कलशेट्टी, पंडित सातपुते, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अलसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, तालुका अध्यक्ष हरीश पाटील आदींसह कार्यकर्त्यांचा आंदोलनात समावेश होता.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #backbone #peasant #country #shattered #Modigovernment #Congress #protests, #शेतकरी #देशाचा #कणा #मोदीसरकार #मोडून #काँग्रेस #निदर्शने
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील दुःखद घटना; पतीचे निधन होताच तासाभरात पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या
Next Article मोहोळमध्ये दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, बार्शीत परप्रांतीय ठेकेदाराला मारहाण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?