Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पेट्रोल स्वस्त करा; नरेंद्र मोदींनी केली सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

पेट्रोल स्वस्त करा; नरेंद्र मोदींनी केली सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Surajya Digital
Last updated: 2022/04/27 at 5:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ महाराष्ट्र, बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट, लगावला टोला

नवी दिल्ली : महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणासह ज्यांनी इंधनावरील कर कमी केलेला नाही, अशा राज्यांनी कर कमी करावा, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींनी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केला होता. अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला, पण काही राज्यांनी व्हॅट कपात केली नाही. आता या सर्व राज्यांनी कर कमी करावा, असे मोदी यावेळी म्हणाले. पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करण्यावरुन महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकरी कर कमी केले आहे.

या वेळी मोदींनी मुंबई आणि कोलकाता या शहरांचे नावं घेऊन येथे पेट्रोल-डिझेलचे दर अधिक असल्याचे सांगितले. त्यांनी विविध करांची आकडेवारी वाचून दाखवली आहे. इंधनावरील व्हॅट महाराष्ट्र आणि बंगालमध्ये सर्वाधिक व्हॅट आहे. इंधन दरवाढीवरून थेट बैठकीतच मोदींनी या दोन राज्यांना टोला लगावला आहे.

राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन मोदी यांनी या प्रसंगी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यासह इतर बिगर भाजप शासित राज्यांना केले आहे. त्यांनी आज बुधवारी (ता.२७) मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ऑनलाईन संवाद साधला. काही राज्यांनी कर कमी केले. मात्र इतरांनी ते केले नाही. त्यामुळे या राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव अधिक आहेत.

Make petrol cheaper; Narendra Modi held discussions with all the Chief Ministers

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

ज्या राज्याने करामध्ये कपात केली आहे, त्यांचे नुकसान होते. काही राज्यांनी आपल्या नागरिकांसाठी करामध्ये कपात केली आहे. त्याचा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. कर्नाटक आणि गुजरात सोडून इतर राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केलेले नाहीत, असे मोदी यांनी बैठकीत बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यांना आठवण करुन दिली आहे.

तुमच्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांनी पेट्रोल-डिझेल कर कपातीबाबत काहीच केलेले नसल्याचे मोदी म्हणाले. देश हितासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये जे करणे आवश्यक होते. ते आता करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जागतिक संकटाच्या काळात सहकारी संघराज्यात टीम म्हणून काम करायला हवे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे.

□ 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या महिन्यात 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 2 ते 4 मे दरम्यान ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 2022 मधील मोदींचा हा पहिला परदेश दौरा आहे. 4 मे रोजी मोदी पॅरिसला भेट देणार आहेत. यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशात महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #Make #petrol #cheaper #NarendraModi #held #discussions #ChiefMinisters, #पेट्रोल #स्वस्त #नरेंद्रमोदी #सर्व #मुख्यमंत्री #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘संजय राऊत यांच्याविरुद्ध ॲट्रोसिटी दाखल करा’
Next Article ओला ई- बाईक : पेट्रोलने पेटवली दिली तर दुसरीकडे गाढवाला बांधून काढली धिंड

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?