Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आत्महत्या केलेल्या डेलकरांना त्रास देणारे पटेल हे मोदींचे सहकारी, एसआयटीमार्फत चौकशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आत्महत्या केलेल्या डेलकरांना त्रास देणारे पटेल हे मोदींचे सहकारी, एसआयटीमार्फत चौकशी

Surajya Digital
Last updated: 2021/03/09 at 5:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : दादरा – नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सभागृहात निवेदन सादर केले. डेलकरांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे नरेंद्र मोदी यांचे सहकारी होते, असा दावा देशमुखांनी केलाय. डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये पटेलांचा उल्लेख आहे. पटेलांसह काही आधिकाऱ्यांनी त्रास दिल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्याबरोबरच काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या मुद्द्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विधानसभेत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे.

खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केलं जात होत. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहात दिली.

* कलाबेन डेलकरांनी गृहमंत्र्यांना दिले पत्र

दादरा नगर हवेलीचे जे प्रशासक आहेत खेडा पटेल. ते पूर्वी भाजपा सरकारच्या काळात गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी कदाचित नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांची प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. त्यांच्या पत्नीने कलाबेन मोहन डेलकर यांनी सुद्धा मला पत्र दिलेलं आहे. अभिनव मोहन डेलकर यांनीही पत्र दिलेलं आहे. यापूर्वी सांगितलेले आरोपच केलेले आहेत,” असं देशमुख म्हणाले.

“त्यामुळे मोहन डेलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून करण्यात येईल. त्याचबरोबर नागपूरमध्ये छत्तीसगढमधील एका आयएएस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरमध्ये येऊन आत्महत्या केली. त्यांचाही तोच उद्देश असावा. ज्या ठिकाणी राजेश श्रीवास्तव अधिकारी आहेत. त्यांना माहिती होत की, भाजपा सरकारकडून न्याय मिळणार नाही. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल,” असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Modi'scolleague #SITprobe #Patel #harassing #Delkar #committed #suicide, #डेलकरांना #त्रास #पटेल #मोदींचेसहकारी #एसआयटीमार्फत #चौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विधानसभेत गदारोळ
Next Article अयोध्येत बनणार श्रीरामांची जगातील सर्वांत उंच मूर्ती, मूर्तीकारांनी सोलापूर दौ-यात दिली माहिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?