Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पेट्रोल दरवाढीवरुन मोदींची मिमिक्री, प्रसिद्ध कॉमेडियनविरुद्ध तक्रार दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पेट्रोल दरवाढीवरुन मोदींची मिमिक्री, प्रसिद्ध कॉमेडियनविरुद्ध तक्रार दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/02/20 at 9:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

जयपूर : राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. हा धागा पकडत प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत एक व्हिडिओ बनवला. मात्र, या व्हिडिओवरुन श्याम रंगीलाची अडचण वाढली आहे. ज्या पेट्रोल पंपावर हा व्हिडिओ करण्यात आला होता, त्या पेट्रोल पंप मालकाने रंगीलाविरोधात तक्रार दाखल केलीय. मात्र ती दाखल करण्यासाठी पेट्रोल पंप मालकावर दबाव आणल्याचं बोललं जात आहे.

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केलीय. तोच धागा पकडत प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत एक व्हिडीओ बनवला. मात्र, याच व्हिडीओवरुन श्याम रंगीलाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. ज्या पेट्रोल पंपावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला त्या पेट्रोल मालकाने रंगीलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पेट्रोल मालकावर दबाव असल्याचंही बोललं जातंय. स्वतः श्याम रंगीलाने देखील याबाबत सूचक विधान केलंय.

कॉमेडियन श्याम रंगीलाने श्रीगंगानगरमधील हनुमानगड रोडवर एका पेट्रोल पंपावर हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आता पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी कॉमेडियन रंगीलाविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. पंप मालक अग्रवाल इंधन पुरवणाऱ्या कंपनीच्या दबावात ही मागणी करत असल्याचंही बोललं जातंय. असं न केल्यास त्यांच्या पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कॉमेडियन श्याम रंगीलाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर भाजप समर्थकांनी यावर आक्षेप घेतलाय.

* श्याम रंगीलाने काय म्हटले

आपल्या कॉमेडी व्हिडीओमध्ये श्याम रंगीलाने पेट्रोल-डिझेलच्या गगनाला शिवणाऱ्या किमतीवर मोदींच्या खास भाषण शैलीत उपरोधात्मक भाष्य केलंय. यात श्याम रंगीला म्हणाला, “माझ्या प्रिय देशवासीयांनो राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या जनतेची छाती अभिमानाने फुगली आहे. या ठिकाणी पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेलीय. भावांनो आणि बहिणींनो स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत असंही एकही सरकार आलं नाही ज्याने पेट्रोलला त्याची खरी किंमत दिली असेल. पेट्रोलला त्याचा हक्क आम्ही मिळवून दिला.” असे म्हटले आहे.

* पेट्रोल पंप मालकाचा खुलासा

पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर फोटो घेण्यासाठी परवानगी घेत व्हिडीओ तयार केल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “कॉमेडियन श्याम रंगीलाने तो पत्रकार असल्याचं सांगत मला फोन केला होता. त्याने माझ्याकडून फोटो काढण्याची परवानगी घेतली होती. मात्र, 17 फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा दरम्यान काही लोक बाईकवर आले आणि त्यांनी व्हिडीओ तयार केला.”

“संबंधित लोक व्हिडीओ काढण्यासाठी पंपावर आले तेव्हा पंपावर गर्दी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्या व्हिडीओ शुटिंगकडे लक्ष दिलं नाही. या प्रकरणात कंपनीची माफी मागण्यात आलीय. तसेच पंपावरील दोन कर्मचाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय,” असंही पेट्रोल पंप मालकाने म्हटलंय.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #Modi'smimicry #overpetrolprice #hike #complaintfiled #against #famouscomedian, #पेट्रोल #दरवाढीवरुन #मोदींचीमिमिक्री #प्रसिद्ध #कॉमेडियनविरुद्ध #तक्रारदाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईशिवाय इतर कोणत्याही संघाने अर्जुन तेंडुलकरमध्ये नाही दाखविला रस, पण का?
Next Article भाजपच्या महिला नेत्याला शिवीगाळ, गुन्हा दाखल

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?