Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ शहरातील घागरे वस्तीवर भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला; हुसकावण्यासाठी फोडले फटाके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळ शहरातील घागरे वस्तीवर भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला; हुसकावण्यासाठी फोडले फटाके

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 9:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मोहोळ शहरालगत असणाऱ्या घागरे वस्तीवर आज शनिवारी दुपारी वस्ती समोरच्या शेळीवर हल्ला केला. ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे लोक भयभीत झाले आहेत.

13 आगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुरव यांच्या शेतात प्रथम बिबट्या दृष्टीस पडला होता. त्यानंतर स्टेशन रोडच्या बाजूच्या शेतकऱ्यानी बिबट्याला पाहिले. त्यानंतर भोयरे, खरकटने असा सीना नदीकाठाच्या झाडाझुडपातून प्रवास करत शेळी, कुत्रा, शिगरू यावर हल्ला करत शनिवारी दुपारी घागरे वस्तीवर आला. मोहन घागरे यांच्या वस्ती समोर असलेल्या शेळी वर हल्ला करून शेळीचे पोटच फोडले.

शेळीच्या ओरडण्याने कुत्र्याचे लक्ष गेले व कुत्री भुकू लागल्याने शेतकरी सावध झाले. मोहन घागरे, अतुल घागरे भगवान घागरे रामचंद्र घागरे, गोविंद घागरे यांनी प्रत्यक्ष आरडाओरड केल्यानंतर बिबट्या उसात पळून गेला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी शेतकरी फटाके उडवू लागले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मोहोळ तालुक्यातील भोयरे परिसरात सलग दोन दिवस बिबट्या आढळला असून शुक्रवारी एका शेतकऱ्याच्या शेळी सह कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर शनिवारी भरदिवसा एका शेळीवर हल्ला करुन जखमी केले. तरीदेखील वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने या परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आत तर पुन्हा बिबट्या मोहोळ शहरालगतच घागरे वस्तीवर असून शिवसेनेचे काकासाहेब देशमुख, मनसेचे शाहुराजे देशमुख , अजित भोसले यांनी घटनास्थळाला भेट देवून शेतकऱ्यांची विचारपूस करून सावध व जागृत राहण्याचे आवाहन केले आहे.

* जिवावर बेतण्याची शक्यता
बिबट्याने आतापर्यत चार प्राण्यावर हल्ला केल्याचे उघड झाले आहे. बिबट्याचा वावर एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने पाहणी करण्याचे ढोंग न करता बिबट्याला पकडण्याचे उपाय योजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #बिबट्या #वावर #मोहोळ #शहरालगत #जिवावर #बेतण्याचा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article किर्ती गोल्ड तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना लातूर जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Next Article भुसारे परिवारातील भावाची व मामाची भूमिका बाबाभाई पठाणने बजावली; दिसली मानवता आणि बंधुभाव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?