Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ : भीमाच्या निवडणुकीत भाजपाच्या महाडिकांना राष्ट्रवादीची साथ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

मोहोळ : भीमाच्या निवडणुकीत भाजपाच्या महाडिकांना राष्ट्रवादीची साथ

Surajya Digital
Last updated: 2022/11/05 at 8:00 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर

मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ वडवळ येथे नागनाथ मंदिरात नारळ फोडून व वडवळ येथे सभा घेवून करण्यात आला. पण या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत भाजपा – राष्ट्रवादीची युती झाल्याचे दिसून येत आहे. Mohol: NCP supports BJP’s Dhananjay Mahadika in Bhima Cooperative Sugar Factory elections

 

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हे भाजपाचे खासदार धनंजय महाडीक याचे सोबत प्रचारात सक्रीय झाले. त्यामुळे सुरुवातीसच धनंजय महाडीक यांनी बाजी मारल्याचे चित्र दिसून आले.

 

भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु झाली अन प्रचाराचे दोन्ही गटांनी नारळ फोडले. या निवडणुकीत धनंजय महाडीक यांच्यासोबत भाजपाचे संतोष पाटील, विनोद महाडीक, विश्वराज महाडीक, पृथ्वीराज महाडीक, भिमाचे व्हा चेअरमन सतीष जगताप, तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण संजिव खिलारे कार्यकर्ते तर आहेत.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, राहुल क्षिरसागर ही तर मंडळी सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस आयचे सुरेश हावळे, भिमराव वसेकर, पद्माकर देशमुख, पुळूजचे शिवाजी शेंडगे, माऊली जाधव, बाबासाहेब जाधव, कुरुल जि प गटाच्या शैला गोडसे अशी दिग्गज नेते मंडळी प्रचारात सहभागी झाली आहेत. हा विरोधकांना मोठा झटका मानला जात आहे.

वसंत घाडगे ( सुस्ते ), धनाजी भारत घाडगे, परिचारक गटाचे सुनिल चव्हाण यांनी महाडीक गटात प्रवेश केला. जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी ही स्टेजवर उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर

 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये चिंतन शिबिर चालू असताना सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्षासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सांवत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफुस आता चव्हाट्यावर आली आहे. जुने आणि नवे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. त्याशिवाय शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या रूपाने सुरूवातीला ही खदखद बाहेर आली. कोल्हे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन लवकरच मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. कोल्हे यांच्यासमवेत राष्ट्रवादीमधील नाराज मंडळी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्याची सुरूवात महिला आघाडीपासून झाली आहे.

 

राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुनंदा साळुंके, शहर मध्य विधानसभा अध्यक्षा राजश्री कोडनूर, शहर कार्याध्यक्षा मनीषा नलावडे, शहर उपाध्यक्षा जयश्री पवार, अश्विनी भोसले, मारता आसादे, शोभा गवळी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

या सर्वांचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वागत केले आहे. यावेळी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणराज चवरे, महेश चिवटे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, संजय सरवदे, राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून ज्या काही महिला पदाधिकारी म्हणून शिंदे गटात प्रवेश केला आहे त्या महिलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही पद देण्यात आलेले नव्हते. मागील सात वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ती पदे होती पण सध्या शिंदे गटात प्रवेश केलेल्या महिलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही पद नाही. शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी कोणतेही पत्र किंवा राजीनामा दिलेला नसल्याचे महिला राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वच महिला पदाधिकाऱ्यांना न्याय मिळतो. पक्ष सोडून गेलेल्या काही महिलांना काम नको केवळ सन्मान हवा होता. यापैकी काही जणी माजी पदाधिकारी आहेत. कोणत्याही विद्यमान पदावर नव्हत्या. काहीजणींना गैरसमज करुन नेण्यात आले. लवकरच पत्रकार परिषद घेउन भूमिका मांडणार असल्याचे सुनीता रोटे (महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी सांगितले.

You Might Also Like

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Mohol #NCP #supports #BJP's #DhananjayMahadika #Bhima #Cooperative #SugarFactory #elections, #मोहोळ #भीमा #सहकारी #साखरकारखाना #निवडणूक #भाजप #धनंजयमहाडिक #राष्ट्रवादी #साथ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही; काँग्रेसचे उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर
Next Article मोहोळ । स्थापत्य सहायक अभियंत्याने गळफास घेवून केली आत्महत्या

Latest News

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन
महाराष्ट्र October 18, 2025
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला
महाराष्ट्र October 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?