Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शाहीन शेख
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरराजकारण

मोहोळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शाहीन शेख

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 11:07 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शाहीन शेख यांची अकरा विरुद्ध सहा मताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवड जाहीर होताच काँग्रेस आयच्या गोटामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेे आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका अर्चना वायचळ यांची दुसऱ्यांदा संधी हुकल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. शिवसेनेचे एक मत फुटल्यामुळे यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे झाले होते. ही सर्व निवडणूक प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडली.

काँग्रेसच्या शाहीन शेख यांची निवड जाहीर होताच त्यांचा आमदार  यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे व इतरांनी त्यांचा सत्कार केला. नगरपरिषदेचे एकूण १७ सदस्य असून शिवसेनेचे ६ सदस्य ,भारतीय जनता पार्टीचा १ सदस्य असे एकूण ७ सदस्य तर राष्ट्रवादीचे ५ सदस्य मोहोळ विकास आघाडीचे ३ सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे २ सदस्य भारतीय जनता पार्टी तून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला १ असे दहाचे बलाबल होते. मात्र नगराध्यक्षपदासाठी ऑनलाइन निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी मतदान केले तर शिवसेनेच्या अतुल गावडे यांनी शाहीन शेख यांच्या बाजूने मतदान केले.  अकरा विरुद्ध सहा अशा मताने शाहीन शेख या विजयी झाल्या.

शाहीन शेख यांची निवड जाहीर होताच मोहोळ येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्याची आतषबाजी केली. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे यांना सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. यावेळी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, माजी तालुकाध्यक्ष राजेश पवार, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, रशीदखा पठाण, अमजद शेख, दाजी कोकाटे, माजी शहराध्यक्ष किशोर पवार यांच्यासह गवत्या मारुती चौकातील व इतर अन्य अनेक जण उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #मोहोळ #नगराध्यक्ष #शाहीनशेख #राष्ट्रवादी #काँग्रेस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन
Next Article ‘दीपिका’ चकवा देत एनसीबीत दाखल; चौकशीसाठी 35 प्रश्नांची यादी तयार

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?